Ind vs Aus: विजय दूरच आता कसोटी वाचवण्यासाठी भारताला खेळावं लागणार

India vs Australia 4th Test Day 5: भारतीय क्रिकेट संघाला टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळायचं असेल तर आजचा विजय अत्यंत आवश्यक आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 30, 2024, 11:45 AM IST
Ind vs Aus: विजय दूरच आता कसोटी वाचवण्यासाठी भारताला खेळावं लागणार title=
सामना रंजक स्थितीत

India vs Australia 4th Test Day 5: भारताला टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळायचं असेल तर मेलबर्न कसोटीमधील शेवटच्या दिवशी भारताला शेवटच्या दिवशी अगदी टी-20 सामना खेळावा लागणार आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाच्या 9 विकेट्स गेलेल्या असतानाच दुसऱ्या दिवशी त्यात मोजक्या धावांची भर घालून 340 धावांचं लक्ष्य भारताला देण्यात आलं आहे. या धावसंख्येची पाठलाग करताना भारताची सुरुवात तशी सावधच झाली. कर्णधार रोहित शर्मा 17 व्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 25 वर असताना तंबूत परतला. त्याने 40 बॉलमध्ये 9 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या के. एल. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. पाच बॉलमध्येच के. एल. राहुल तंबूत परतला. 

Live Updates:

> 11 वाजून 30 मिनिटं : 15 ओव्हरचा खेळ शिल्लक असताना भारताचे 8 गडी तंबूत परतले असून आता विजयाऐवजी सामना वाचवण्यासाठी लढावं लागणार.

> 10 वाजून 12 मिनिटं: तिसऱ्या सत्रातील खेळामध्ये झटपट धावा करण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. पंत बाद झाल्याने भारताची स्थिती 121 वर चार बाद अशी झाली. फलंदाजीसाठी जडेजा मैदानावर.

भारताची मदार या फलंदाजावर

विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असतानाच तो ही फार यशस्वी ठरला नाही. संघाची धावसंख्या 33 वर असतानाच विराट कोहली 29 बॉलमध्ये 5 धावा करुन तंबूत परतला. एकीकडे सलामीवर यशस्वी जयसवाल किल्ला लढवत असताना दुसरीकडे त्याला साध देत कोणी मैदानात उभं असल्याचं दिसलं नाही. दुसऱ्या सत्रातील खेळ संपताना भारताची धावसंख्या 112 वर 3 बाद अशी स्थिती होती. भारताचा सलमावीर यशस्वी जयस्वाल 159 बॉलमध्ये नाबाद 63 धावांवर तर ऋषभ पंत 93 बॉलमध्ये 28 धावांवर खेळत होते. 

भारतासमोर वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी खेळायचं असेल तर काय करावं लागेल? 

- भारतीय संघाला अंतिम फेरीत सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटी (मेलबर्नसह) जिंकाव्या लागतील. भारतीय संघाने एकही सामना ड्रॉ केला किंवा हरला तर त्याला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

- जर भारतीय संघाने बॉर्डर गावसकर चषक मालिका 2-1 ने जिंकली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील मालिकेत श्रीलंकेने किमान एक सामना अनिर्णित ठेवण्याची आशा करावी लागेल.

- ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास भारत 55.26 टक्के गुणांवर असेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 किंवा 2-0 अशी जिंकली तरच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

-  श्रीलंकेविरुद्धची मालिका 0-0 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे भारतासारखे 53.51 टक्के गुण होतील. मात्र या चक्रात भारत अधिक मालिका जिंकण्याच्या जोरावर पुढे असेल. श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकली तर ते भारताच्या पुढे जातील.

- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 ने गमावल्यास 51.75 टक्के गुणांसह अंतिम शर्यतीतून बाहेर पडेल.