राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर संकट कायम, काय आहे राजकीय गणित?

सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप

Updated: Jul 13, 2020, 10:52 AM IST
राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर संकट कायम, काय आहे राजकीय गणित? title=

जयपूर : गहलोत सरकारवर संकट आणखीनच तीव्र होत आहे. काही तासात सरकारचे भवितव्य जवळपास निश्चित होईल. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. सचिन पायलट हे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत येणार नाही याचा अर्थ ते राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात येणार आहे.

असे म्हटले जात आहे की, काँग्रेसचे बंडखोर आमदार हरियाणाच्या मेवात येथे सचिन पायलट यांच्यासह आहेत. येथे भाजपचे सरकार आहे. सचिन पायलट यांनी असे म्हटले आहे की, गहलोत सरकार अल्पमतात आहे. हे विधान गेहलोत सरकार पडण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे. सचिन पायलट यांनी शनिवारपासून कोणत्याही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केलेली नाही, परंतु पायलट यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांच्यासह 27 आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करु शकतात. याशिवाय तीन अपक्ष आमदारही भाजपमध्ये येऊ शकतात. सचिन पायलट यांनी असा दावा केला की, 30 आमदार त्यांच्यासोबत आहेत. हे आमदार विधानसभा अध्यक्षांना राजीनामा पाठवू शकतात.

राजकीय गणित

राजस्थानमध्ये काँग्रेसचे 107 आमदार आहेत. त्यांच्यासोबत 12 अपक्ष आणि इतर पक्षाचे 6 आमदार सोबत आहेत. तर भाजपकडे 72 आमदार असून आरएलपीकडे 3 आमदार आहेत. जर 27 आमदार सचिन पायलट यांच्यासोबत आले तर गेहलोत सरकार अल्पमतात येईल. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 101 आमदारांना पाठिंबा आवश्यक आहे.
वर्तमान समीकरण ...

एकूण जागा - 200

बहुमतासाठी - 101

काँग्रेस - 107 
अपक्ष - 12 
इतर - 06

आरएलपी - 03 
भाजप - 72