फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय सांगतात? जाणून घ्या

सध्या देशभरात शबनम प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे

Updated: Apr 3, 2022, 01:05 PM IST
फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराच्या कानात काय सांगतात? जाणून घ्या title=

मथुरा : सध्या देशभरात शबनम प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शबनम नावाच्या महिलेला उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. मात्र, केवळ फाशीची तारीख निश्चित व्हायची आहे. शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून तिच्याच घरातील 7 जणांची हत्या केली होती. सलीम सध्या रामपूर कारागृहात आहे. आज आम्ही तुम्हाला शबनम प्रकरण काय आहे आणि फाशी देण्यापूर्वी फाशी देणारा गुन्हेगाराच्या कानात काय बोलतो ते सांगत आहोत.

फाशी देण्यापूर्वी काय होते?

कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी, जल्लाद कैद्याच्या वजना इतका पुतळा लटकवून फाशीची ट्रायल घेतो. दोषीच्या नातेवाईकांना 15 दिवस अगोदर कळवले जाते की ते कैद्याला शेवटचे भेटू शकतात.

फाशी देणारा हा शेवटचा शब्द दोषीच्या कानात म्हणतो...

फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो, "मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मी कायद्याला बांधिल आहे." यानंतर, जर गुन्हेगार हिंदू असेल तर जल्लाद त्याला राम-राम म्हणतो, तर गुन्हेगार मुस्लिम असल्यास त्याला शेवटचा सलाम करतो.

असे म्हटल्यानंतर, जल्लाद लीव्हर ओढतो आणि दोषीचा जीव जाईपर्यंत लटकतो. यानंतर, डॉक्टर गुन्हेगाराच्या नाडीचा मागोवा घेतात. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो.

फाशीच्या दिवशी काय होते?

फाशीच्या दिवशी कैद्याला आंघोळ करून नवीन कपडे दिले जातात.
पहाटे कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात.
फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त तीन अधिकारी उपस्थित असतात.
हे तीन अधिकारी कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात.
अधीक्षक फाशी देण्यापूर्वी दंडाधिकाऱ्याला कळवतात की कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचे वॉरंट वाचून दाखवण्यात आले आहे.
डेथ वॉरंटवर कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात.
फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.
ज्या जेल मॅन्युअलमध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण केल्या जातात.
फाशी देताना फक्त जल्लादच दोषींसोबत असतो.

शबनम प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात राहणाऱ्या शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून एकूण 7 जणांची हत्या केली होती. 14-15 एप्रिल 2008 च्या रात्री त्याने आपल्याच घरात हा रक्तरंजित गुन्हा केला. तिने तिचे आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि निष्पाप पुतण्या यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनमने हत्या केलेली तिची वहिनी गर्भवती होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा बहाल केल्यानंतर राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज फेटाळला असून, आता तिला लवकरच फाशी होणार आहे.