राजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...

बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Jul 26, 2017, 08:24 PM IST
राजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...  title=

पटणा : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना भेटून नितीशकुमार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे बिहारमधलं आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचं बिहारमधलं महागठबंधन संपुष्टात आलेलं आहे.  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले नितीश कुमार?

- मी युतीच्या धर्माचं पालन केलं, राहुल गांधींशीही चर्चा केली.

- या वातावरणामध्ये काम करणं खूप कठीण झालं होतं, मी युतीच्या धर्माचं पालनं केलं.

- तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत उत्तर द्यायला हवं होतं.

- विरोधकांची एकता अजेंडा नव्हता, रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदासाठी समर्थन देतानाही आम्हाला विरोध करण्यात आला.

- मी कधीही तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितला नाही

- बिहारचं हित बघूनच पुढचा निर्णय घेऊ

- अंतरात्म्याचा आवाज ऐकून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

- जी जागा आपल्यासाठी उपयुक्त नाही तिथून स्वत:हूनच जावं

- नोटबंदीनंतर आम्ही बेनामी संपत्तीवरच्या कारवाईचं समर्थन केलं

- मी कोणालाही दोष देत नाही. हे आलेलं संकट नाही तर ओढावून घेतलेलं संकट आहे.