मुंबई : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं महागात पडतं. वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंडही आकारण्यात येतो. तुम्ही कधी वाहतूक नियम मोडला आहे का? आणि जर हो, तर मग अशावेळी तुम्ही वाहतूक पोलिसांना काय कारण देता? काही जण शे-दोनशेवर मांडवली करुन निघून जातात. पण काही बहाद्दर असे असतात, जे असं काही कारणं देतात. ती कारणं ऐकून वाहतूक पोलिसांना काय करु सुचत नाही. रडू की हसू अशी परिस्थिती या वाहतूक पोलिसांची होऊन जाते.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी यूजर्सला विचारलं की, 'तुम्ही वाहतूक नियम मोडल्यास वाहतूक पोलिसांनी पकडले, तर तुम्ही दंडापासून वाचण्यासाठी त्यांना काय कारण देता.' त्यानंतर यूजर्सने जी काही कारणं दिली ते वाचून तुमचं हसून हसून पोट दुखणार यात शंका नाही.
What are the most creative excuses you’ve given to Traffic Police after violating rules ? @dtptraffic
— Delhi Police (@DelhiPolice) July 8, 2022
"सर प्रेयसी वाट पाहतेय. वेळेत नाही पोहोचलो तर ब्रेकअप होईल.' गंमत म्हणजे हा पठ्ठ्या म्हणतो 'माझं हे कारण कायम वाहतूक पोलीस ऐकून मला सोडून देतात", असं या प्रेमवीराने सांगितलं.
वाहतूक पोलिसांनी एका नियम मोडणाऱ्याला पकडलं आणि त्याचाकडे लायसन्स मागितलं. तर ऐका हा काय म्हणतोय ते, 'सर कुत्र्याने माझं लायसन्स खाऊन टाकलं.' सांगा आता काय करायचं अशा लोकांचं?
तर तिसरा म्हणतो, "सर मी पहिल्यांदा नियमाचं उल्लंघन केलं आहे, मला सोडून द्या...पुढच्या वेळी नाही होणार असं".
सौरभ श्यामल या यूजरने तर हद्द केली. त्याला वाहूतक पोलिसांनी हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून पडकलेलं. तर सौरभ म्हणाला, "सर मी विद्यार्थी आहे आणि माझ्याकडे पैसे नाही.
तर एका महिलेला पोलिसांनी सीटबेल्ट लावलं नाही म्हणून पडकलं, तर ती म्हणते "सर मी गर्भवती आहे, तर सीट बेल्ट नाही लावू शकतं".
या युजरने आपल्या मैत्राचा किस्सा सांगितला आहे. "माझ्या मित्राला पोलिसांनी पडकलं, तर तो म्हणाला, सर माझ्या बायकोचं कोणासोबत अफेयर सुरु आहे. आता ती त्या व्यक्तीसोबत आहे. म्हणून मला जाऊ द्या."
तुम्ही कधी वाहतूक नियम मोडले आहेत का?, आणि जर वाहतूक पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुम्ही काय कारण देता. आम्हाला पण सांगा तुमचा मजेशीर बहाणा...