एकनाथ शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद, काय भूमिका मांडणार?

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गट आज अधिकृत भूमिका मांडणार आहे. मीडियापासून लांब राहणाऱ्या शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होत आहे. 

Updated: Jun 25, 2022, 10:08 AM IST
एकनाथ शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद, काय भूमिका मांडणार? title=

गुवाहाटी : Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गट आज अधिकृत भूमिका मांडणार आहे. मीडियापासून लांब राहणाऱ्या शिंदे गटाची आज पहिली पत्रकार परिषद होत आहे. आमदार बच्चू कडू आणि भरत गोगावले हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची नेमकी पुढील काय भूमिका असणार आहे, याचा उलगडा होणार आहे. शिंदे गटाची आज 2 वाजता महत्त्वाची बैठक होत आहे. भरत गोगावले, बच्चू कडू भूमिका स्पष्ट करणार आहेत.

शिंदे गटाकडून आज शिष्टमंडळाची स्थापना होणार आहे. तसेच इतर राजकीय पक्षांशी वाटाघाटी करणार असल्याची माहिती मिळत आहे. शंभुराजे देसाई, गोगावले आणि भुसे आणि बच्चू कडू हे शिष्टमंडळात असणार आहेत. बडोद्याला शिष्ट मंडळाची चर्चा होणार आहे.

तर एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार आहेत. प्रवक्ता गटाची भूमिका माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. प्रवक्ते नेमणुकीचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जनतेपर्यंत गटाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रवक्ता नेमणूक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.