Viral Video: 'तोकडे कपटे घालाल तर बलात्कार होणारच...'

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलींच्या कपड्यांवरून प्रश्न उठला जात आहे. 

Updated: May 1, 2019, 08:47 PM IST
Viral Video: 'तोकडे कपटे घालाल तर बलात्कार होणारच...'

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल दोताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलींच्या कपड्यांवरून प्रश्न उठला जात आहे. २१व्या शतकातही जूने विचार धरून असलेले अनेक लोक आहेत. एका महिलेने छोटे कपडे घालणऱ्या मुलींवर निशाना साधला आहे. ही घटना दिल्लीतील आहे. शिवानी गुप्ता नावाच्या एका मुलीने हा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे. छोटे कपडे घालणाऱ्या मुलींवर बलात्कारच व्हायला हवाय असे विधान व्हिडीओमधील महिलेने केले आहे. 

तिच्या अशा वादग्रस्त विधानानंतर जमलेल्या सर्व महिलांनी तिला धारेवर धरल्याचे दिसून येत आहे. मुली फक्त मुलांना आकर्षित करण्यासाठी लहान कपडे घालतात. लहान कपडे घालून रस्त्यांवर फिरतात आणि कोणी मुलगा काहीही बोल्ला तर लगेच त्यांच्या कानशीलात लगावून देतात. अशा मुलींवर बलात्कारच व्हायला हवा. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x