राहण्यायोग्य शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांनी मारली बाजी?

तुमचं शहर आहे का राहण्यायोग्य शहरांच्या यादीत? 

Updated: Mar 4, 2021, 05:49 PM IST
राहण्यायोग्य शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांनी मारली बाजी?

इज ऑफ डूईंग म्हणजेच राहण्याय़ोग्य जागांमध्ये पुण्यानं देशात दुसरा क्रमांक पटकावलाय. १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरांमध्ये बंगळुरू पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या क्रमांकावर, सहाव्या स्थानावर नवी मुंबई तर दहाव्या स्थानावर ग्रेटर मुंबई आहे. देशाची राजधानी दिल्लीचा १३ वा नंबर आलाय.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं या शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार

 • १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं:
 1. बंगळुरू
 2. पुणे
 3. अहमदाबाद
 4. चेन्नई
 5. सूरत
 6. नवी मुंबई
 7. कोईम्बतूर
 8. वडोदरा
 9. इंदूर
 10. ग्रेटर मुंबई
 • १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली सर्वोत्तम शहरं
 1. शिमला
 2. भुवनेश्वर
 3. सिल्वासा
 4. काकिनाडा
 5. सेलम
 6. वेल्लोर
 7. गांधीनगर
 8. गुरूग्राम
 9. दावनगेरे
 10. तिरूचिरापल्ली

 

राहण्यासाठी उत्तम असलेल्या शहरांच्या सर्वेक्षणात एकूण १११ शहरांचा समावेश होता. शहरातील विकास, वातावरण, सुविधा अशा गोष्टींचा या सर्वेक्षणात विचार करण्यात आलेला.