तामिळनाडु : तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय लष्काराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि काही मोठे अधिकारी होते. ज्या भागात हेलिकॉप्टर क्रॅश झालं, तो भाग पूर्ण जंगलाने वेढलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते.
हेलीकॉप्टर मध्ये कोण कोण होते?
जनरल बिपिन रावत, CDS
मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी
ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर
लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह
नायक गुरसेवक सिंह
नायक जीतेंद्र कुमार
लांस नायक विवेक कुमार
लांस नायक बी साई तेजा
हवालदार सतपाल
हेलिकॉप्टर अपघातातून आतापर्यंत तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार खराब वातावरणामुळे हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना लष्काराच्या वेलिंग्टन बेसमधध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार MI - 17V5 बनावटीचं हे हेलिकॉप्टर आहे.