झिका वायरसची भारतातही लागण

ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवण्या-या झिका वायरसची भारतातही लागण झालीय. 

Updated: May 27, 2017, 11:06 PM IST
झिका वायरसची भारतातही लागण

अहमदाबाद : ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवण्या-या झिका वायरसची भारतातही लागण झालीय. 

जागतिक आरोग्य संघटनेने गुजरातमधील तीन जणांना झिका वायरसची लागण झाल्याचं स्पष्ट केलंय. भारतात झिका वायरसची लागण होण्याची हि पहिलीच वेळ आहे. तिन्ही रुग्ण अहमदाबादच्या बापूनगरचे रहिवासी आहेत. 

अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये 10 ते 16 फेब्रुवारीदरम्यान एकूण 93 रक्ताचे नमुने घेण्यात आले होत. यातील एका 64 वर्षीय व्यक्तीला झिका वायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.