Covid 19 Case : WHO ने जगभरातील कोरोना विषाणुमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा आकडा जाहीर केला आहे. जगभरात 21 ते 27 मार्च दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. पण मृतांचा आकडा 43 टक्के वाढला आहे.
अमेरिका (USA) आणि चिली (Chile) मध्ये कोरोना व्हायरसच्या मृतांचं आकलन वेगवेगळ्या प्रकारे केले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 47 कोटी 90 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या आठवड्यात कोरियामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरियामध्ये 24 लाख 42 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जर्मनीमध्ये 16 लाख रुग्णांची नोंद झाली आहे.
मागच्या आठवड्यात चिलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. चिलीमध्ये 11 हजार 858 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 5 हजार 367 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यूच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात 4 हजार 525 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
WHO ने मागील आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचा इशारा दिला होता. कारण प्रत्येक देशात चाचण्या कमी झाल्या आहेत. ज्यामुळे रुग्णांचा आकडा कमी देखील असू शकतो.
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शंघाई सारख्या शहरात लॉकडाऊन लागू करावे लागले आहे.
आफ्रिकेत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 29 टक्के, अमेरिकेत 15 टक्के, यूरोपमध्ये 4 टक्के तर दक्षिण पूर्व आशियामध्ये 14 टक्के घट झाली आहे.