बनारसी साड्या इतक्या महाग का असतात? त्या कशा बनवल्या जातात माहित आहे का?

हे ब्रोकेड काय आहे, त्यापासून बनवलेल्या साड्या इतक्या महाग का असतात?

Updated: Aug 11, 2021, 05:57 PM IST
बनारसी साड्या इतक्या महाग का असतात? त्या कशा बनवल्या जातात माहित आहे का? title=

मुंबई : साड्यांसाठी बायका नेहमीच वेड्या असतात. कोणतीही नवीन साडी बाजारात आली की, बायका लगेच ती घेण्यासाठी दुकानात जातात. साड्यांचे अनेक प्रकार असतात. कांजिवरम, बांधनी, नऊवारी, चिकनकरी, बनारसी इत्यादी. परंतु प्रत्येक साड्यांची किंमत ही, वेगवेगळी असते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, या साड्यांची किंमत कशी ठरवली जाते? त्यात काही साड्या जसे बनारसी, कांजिवरम या साडी सगळ्यात महाग का असतात?

उत्तर प्रदेशातील हातमाग कामगार बनारसी साडीला ब्रोकेड करतात. ब्रोकेड केलेला कोणताही कपडा किंवा साडी असूदे ती तुम्हाला महागच मिळणार. त्यामुळे ब्रोकेडपासून बनवलेल्या साडीची किंमतही 5 लाखांपर्यंत असू शकते. 

आता तुम्ही म्हणाल की, हे ब्रोकेड काय आहे, त्यापासून बनवलेल्या साड्या इतक्या महाग का असतात?

तर ब्रोकेड हे खरं तर एक कापड आहे, ज्यावर सोने किंवा चांदीच्या धाग्यांनी भरतकाम केले जाते. हे एकेकाळी राजा-महाराजांसाठी आणि फक्त राजघराण्यातील सदस्यांसाठी बनवले जात असे. परंतु आता तुम्हाला सर्वत्र ब्रोकेड केलेल्या साड्या किंवा कपडा मिळेल.

बाकी कपड्यांवर सुरवातीला भरतकाम केलेल्या फॅब्रिकवर आधी डिझाईन केले जात असे आणि नंतर धाग्यांनी भरतकाम केले जात असे. तिथे ब्रोकेडला डिझाईन नसते, तर त्यावर थेट नक्षीकाम केलेलं असतं.

जुन्या दिवसात रेशीम कपड्यावर ब्रोकेडचे काम अनेकदा केले जायचे. परंतु आता जसा काळ बदलला आणि तंत्रज्ञान प्रगत झाले, लोकर आणि सूती कापड, अगदी कृत्रिम कापडांवरही ब्रोकेडचा वापर होऊ लागला आहे. ब्रोकेडमध्ये एकावेळी 100 ते 600 धागे वापरले जातात.

चीनमधून आले ब्रोकेड

जर ब्रोकेडचा इतिहास पाहिला तर तुम्हाला असे समजेल की, हे प्रथम चीनमध्ये सुरू केले गेले होते. चिनमध्ये 475 ते 221 बीसी पर्यंत ब्रोकेड वापरला जात असे. नंतर हे ब्रोकेड युरोप आणि आशियातील देशांमध्ये आल्यानंतर, आता जगातील प्रत्येक देशात त्याचा प्रचंड वापर केला जात आहे.

बनारसमध्ये बनवलेली ब्रोकेड साडी सिल्क फॅब्रिकपासून बनवली जाते. या साडीवर जरीच्या डिझाईन्स बनवल्या जातात. यामुळे या साडीचे वजन वाढते. या साड्यांमध्ये मुघल काळापासून प्रेरित डिझाईन्स असतात. याशिवाय त्यांच्यामध्ये सोन्याचे काम केले जाते आणि त्यावर जाळीसारखा नमुना तयार केला जातो. तसेच बनारसमध्ये साडीचे काम पारंपारिक पद्धतीने केले जाते ज्याला जाला, पगिया आणि नाका या नावाने ओळखले जाते.

बनारसी साडी कधीपासून वापरली जाते

गुजरातमधील रेशीम विणकर उपासमारीमुळे बनारसमध्ये स्थायिक झाले होते. त्यावेळी रेशीम ब्रोकेडचे काम 17 व्या शतकात येथून सुरू झाल्याचे सांगितले जाते. 18 व्या आणि 19 व्या शतकात ते चांगले  कुशल होत गेले. 

मुघल काळात, म्हणजे 14 व्या शतकाच्या आसपास, सोन्या -चांदीच्या धाग्यांना ब्रोकेड विणण्यासाठी प्राधान्य दिले जात असे. हळूहळू हे धागे बनारस आणि बनारसी रेशीमची ओळख बनले. त्यानंतर ब्रोकेड आणि झरीचा पहिला उल्लेख १९ व्या शतकातील बनारसी साड्यांमध्ये आढळतो.

ब्रोकेडमुळे बनारसी साडीची किंमत 3 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 5 लाख रुपयांपर्यंत जाते.  याशिवाय दक्षिण भारतात बनवलेल्या कांजीवरम साड्यांमध्येही ब्रोकेडचे काम केले जाते. या साड्याही खूप महाग आहेत.

पारंपारिक बनारसी साडीवरील ब्रोकेडचे काम आता उत्तर प्रदेशात कुटीर उद्योग म्हणून स्थापित झाले आहे. बनारसी साड्यांवर सुमारे 1.2 दशलक्ष लोक ब्रोकेडच्या कामात गुंतलेले आहेत. बनारसी साड्यांवरील ब्रोकेड कामामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. हे लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या उद्योगाशी संबंधित आहेत आणि हातमाग रेशीम उद्योगाचा भाग आहेत.

बनारसी साड्या आणि ब्रोकेडचे काम उत्तर प्रदेशातील वाराणसी, मिर्झापूर, गोरखपूर, चंदौली, जौनपूर आणि आझमगड या 6 जिल्ह्यांमध्ये स्थायिक झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बनारसी साड्या आणि ब्रोकेड्सची कला जिवंत करण्याच्या प्रयत्नात वाराणसीतील काही ब्रॅण्ड समोर आले आहेत. हे ब्रँड विणकरांच्या तयार साड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.