Gold Silver Price Drop : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रिय बाजारातील चढ-उतार सोन्याच्या भावातील घसरणीला कारणीभूत ठरलीये.त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे का? असा प्रश्न निश्चितच विचारला जातोय.दुसरीकडे थोड्याच दिवसांत नवरात्रोत्सव आणि दिवाळी सारखे सण आहेत.भारतातील या सणांना फार महत्त्व आहे. विशेषतः धनत्रयोदशी आणि दिवाळीला हमखास सोनं खरेदी केली जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण पहायला मिळतेय. विशेषतः अमेरिकी बाजारात दबाव वाढल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर होतोय..बुधवारी आंतरराष्ट्रिय बाजारात सोन्याचा भाव 0.17 टक्के घसरुन 1827.40 डॉलर प्रतिग्रॅम वर पोहचला.तर चांदीचा भावही घसरल्याचं पाहायला मिळालं.
सुवर्णनगरी जळगावात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या वर्षभरात सोनं दरात 5 हजारांची घसरण झालेय. चांदीच्या दरात 8 हजारांची घसरण झालेय. सोनं 59 हजार 19 रूपये प्रतितोळा इतकं स्वस्त झालयं. तर चांदीचा दर 69 हजार प्रतिकिलो रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून त्याचे पडसाद हे सोन्या चांदीच्या भावावर झाले असल्याची माहिती जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे
सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण पहायला मिळत असली तरी आगामी काळ देशात सणासुदीचा असणार आहे. या काळात खरेदी वाढेल त्यामुळे सोन्याच्या किमती काही प्रमाणात वाढू शकतील.अशीही शक्यता व्यक्ती केली जातेय. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरातल्या चढउताराचा हा परिणाम आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याचे दर 3000 रूपयांनी घसरले. तर चांदीचे दर 10 दिवसांत 6000 रूपयांनी कमी झालेत. मात्र आता पितृपक्षानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी त्याचबरोबर लग्नसराईमुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढणार आहे.