Uber Driver Misbehave With Woman: Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली. Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी धावत्या कारमधून उडी घेतली. पीडित महिले सोशल मिडियाद्वारे तिच्यासह घडलेल्या प्रकाराचा अनुभव शेअर केला आहे.
मनाली गुप्ता असे पीडित महिलेचे नाव आहे. मनाली गुप्ता यांनी @littlesssisters या इन्स्टाग्राम हँडलवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडडिओच्यामाध्यमातून मनाली गुप्ता यांनी यांनी आपला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. उबेर चालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप मनाली गुप्ता यांनी केला आहे. मनाली गुप्ता यांनी आपली लोकेशन शेअर केलेली नाही. यामुळे त्या नेमक्या कुठे राहतात हे समजू शकलेले नाही. मात्र, मीनल गुप्ता यांनी कार नंबर तसेच उबेर चालकाचे सर्व डिटेल्स व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. 2018 Eon, RJ14 TE 5679 असा कार नंबर आहे. तर, श्याम सुंदर असे कॅब चालकाचे नाव असल्याचे मीनल गुप्ता यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
मी माझ्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी उबर कॅब बुक केली. कॅब सुरु झाल्यानंतर मी एका फोन कॉलमध्ये व्यस्त होते. यावेळी ड्रायव्हरने अचानक माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. ड्राव्हरचे हे कृत्य पाहून मला धक्का बसला, मी खूप भयभित झाले. मी त्याला विरोध केला. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली. असभ्य भाषेत बोलत त्याने माझ्याशी गैरवर्तन देखील करण्याचा प्रयत्न केला. मी भीतीने आरडा ओरडा करत त्याला ताबडतोब कार थांबवण्याची विनंती केली, परंतु त्याने माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत कारचा स्पीड आणखी वाढवला. मला काय करावे काही सुचत नव्हते. यामुळे भयभित होवून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी धावत्या कारमधून बाहेर उडी घेतली असे मीनल गुप्ता यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
मीनल गुप्ता यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत उबेर ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, मीनल यांचा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांना सपोर्ट करत ड्रायव्हरवर कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. तर, अनेक युजर्सनी उबेर कॅबवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.