मुंबई : आपण लहानपणापासून मुंग्यांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. तसचे आपल्याला अनेकदा मुंग्याच्या शिस्तीचे उदाहरण देखील दिले जाते. मुंग्यांना आपण लहानपमापासून रांगेची शिस्त पाळत एका सरळ रेषेत चालताना पाहिले आहे. शेकडो आणि हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या या मुंग्या आपला रस्ता कसा हरवत नाहीत? त्या एका मागे एक कसे चालत जातात? आपण कधी विचार केला आहे की असे का होते?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात मुंग्यांच्या 12,000 हून अधिक प्रजाती आढळून आल्या आहेत. असे म्हटले जाते की, मुंग्यांचा आकार केवळ 2 ते 7 मिलीमीटर असतो, परंतु त्यांच्याकडे स्वत: च्या वजनापेक्षा 20 पट जास्त वजन उचलण्याची क्षमता असते. मुंग्या झोपतही नाहीत. पृथ्वीवरील एकूण मुंग्यांची संख्या माणसांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. प्रत्येक मुंगीच्या कळपात एक राणी मुंगी असते आणि राणी मुंगीचे आयुष्य 30 वर्षे असते.
मुंग्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वासा घेण्याची प्रचंड क्षमता असते. त्यांच्या अँटीनावर त्यांच्याकडे अत्यंत संवेदनशील घाणेंद्रियाचे रिसेप्टर्स आहेत आणि त्यांच्या मदतीने त्यांना अन्न शोधणे सोपे आहे. इतर प्रकारच्या कीटक आणि लहान प्राण्यांपेक्षा मुंग्यांकडे 4 ते 5 पट जास्त रिसेप्टर्स असतात. हेच कारण आहे की, मुंग्यांना त्यांचा आहार शोधणे खूप सोपे होते.
मुंग्याच्या वसाहतीत काम करणाऱ्या मुंग्यांवर राणी मुंगीसाठी भोजनाची व्यवस्था करण्याची आहे. या मुंग्या आपल्या रिसेप्टर्सच्या मदतीने अन्नाच्या शोधात बाहेर जातात. त्यांना अन्नाची माहिती मिळताच ते तेथे फेरोमोन नावाचे द्रव तिथे सोडतात. एका अंदाजानुसार कामगार मुंग्या त्यांच्या कॉलनीपासून सुमारे एक किलोमीटर दूर अन्न शोधण्यासाठी जातात.
मुंग्यांमध्ये एक विशेष प्रकारचे रसायन आढळते, ज्याचे नाव फेरोमोन आहे. या रसायनाच्या मदतीने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. सगळ्यात पुढे चालणाऱ्या मुंगीला कोणताही धोका जाणवतो, तेव्हा ती या द्रव्याच्या मदतीने इतर मुंग्यांना सतर्क करते. पण आता प्रश्न आहे की, ते सरळ रेषेत का चालतात?
जेव्हा कामगार मुंग्यांना काही प्रकारचे अन्न किंवा इतर स्त्रोताबद्दल माहिती मिळते, तेव्हा या मुंग्या परत येण्यासाठी फेरोमोन द्रव तिथे सोडतात आणि पुढे जातात. अशाच प्रकारे, कामगार मुंग्या त्यांच्यामागून येणाऱ्या मुंग्यांसाठी यासारखेच द्रव्य सोडतात. ज्याची ओळख पटवत आणि वास घेत या मुंग्या एकमेकांच्या मागून चालतात. त्यामुळे त्या आपल्याला सरळ रेषेत चालताना दिसतात.