पाण्यातील मृतदेह वर यायला नेमका किती वेळ लागू शकतो?

सर्व जिज्ञासू प्रश्नांना तार्किक उत्तरं देण्यासाठी 'विज्ञान' म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स आणि तिथल्या तज्ज्ञांचा आधार घ्यावा लागेल.

Updated: Jul 14, 2021, 04:54 PM IST
पाण्यातील मृतदेह वर यायला नेमका किती वेळ लागू शकतो?

मुंबई : तुम्ही हे ऐकले असणार किंवा पाहिले असणार की, एखाद्याचा मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर किंवा एखादा व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर तो काही काळानंतर वर येतो. कोणतीही वजनदार गोष्ट जर आपण पाण्यात टाकली तर ती खाली जाते. माणसाच्या शरीराच्या वजनापेक्षा दगडाचे वजन कमी असते, तरी देखील ते पाण्यात टाकल्याने आत बुडते, मग मानवी शरीर का तरंगते? किंवा ते का काही कालांतराने वर येते? माणूस असाच पाण्यात पडला, तर तो बुडतो, पण त्याचा मृतदेह का बुडत नाही? तो का पाण्याच्या वरती येतो? खरेतर मृतदेहाचे स्वतःचे एक सूत्र ज्यामुळे ते पाण्यात बुडत नाही.

सर्व जिज्ञासू प्रश्नांना तार्किक उत्तरं देण्यासाठी 'विज्ञान' म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स आणि तिथल्या तज्ज्ञांचा आधार घ्यावा लागेल. जे या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे देतील.

यामध्ये तज्ज्ञांनी तीन मुख्य मुद्दे सांगितले आहेत. ते म्हणजे 'बायोसेन्सी' किंवा 'ब्युएन्सी' प्रक्रिया, मृतदेहात असलेल्या टिश्यूमध्ये तयार होणारे अनेक प्रकारचे वायू आणि तिसरा म्हणजे घनता.

प्रथम बायोनसी म्हणजेच उत्प्लावन प्रक्रियेबद्दल बोलूयात. ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीस यांनी जगात सर्वप्रथम उत्प्लावन आणि घनतेच्या सिद्धांताबद्दल सांगितले. या सिद्धांतानुसार कोणतीही वस्तू तोपर्यंत पाण्यावर तरंगू शकते, जोपर्यंत त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते. त्यानुसार, मृतदेह काही ठराविक काळासाठी पाण्याखालीही बुडालेला असतो. त्याच तत्त्वानुसार, मृतदेह स्वतःहून पाण्याच्या वर येतो आणि पाण्यावर तरंगु लागतो.

जर आपण या विषयावर जगातील कोणत्याही फॉरेन्सिक विज्ञान तज्ज्ञाशी चर्चा केली, तर हे दोन-तीन प्रमुख मुद्दे समोर येतील. दिल्लीमधील दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटलचे फॉरेन्सिक सायन्स विभाग प्रमुख डॉ बी.एन. मिश्रा यांनीही या वस्तुस्थितीची पुष्टी केली.

डॉ. मिश्रा म्हणतात, “कोणत्याही मृत देहाच्या पाण्यात राहण्याची किंवा बाहेर राहण्याची संपूर्ण प्रक्रिया फॉरेन्सिक विज्ञानात नमूद केलेल्या या दोन-तीन मुद्द्यांवर आधारित आहे. एक म्हणजे मृतदेहाची घनता नेहमीच पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. मृतदेहाच्या आत वायू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होताच, मृत शरीराची घनता कमी होऊ लागते आणि त्या तुलनेत पाण्याचे घनता वाढू लागते. म्हणूनच मृतदेह पाण्यावर तरंगू लागतो."

हे विज्ञान समजून घेणे देखील महत्वाचे

फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञ डॉ. मिश्रा यांच्या मते, “या व्यतिरिक्त एखाद्याचा मृत्यू होताच. त्याच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे गॅस तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. या वायूंचे बरेच प्रकार आहेत. फॉरेन्सिक सायन्सच्या जगात, सहसा केवळ चार मोठ्या वायूंच्या नावांची चर्चा केली जाते किंवा उल्लेख केला जातो. ते म्हणजे कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड आणि सल्फर डाय ऑक्साईड इ."

जेव्हा एखादा मृतदेह पाण्याशी संपर्क साधतो, तेव्हा मृतदेहाच्या आत या वायूंच्या निर्मितीची गती पाण्याच्या तपमानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर शरीर थंड पाण्यात असेल तर, त्या आत वायू तयार होण्याचे प्रमाण कमी असते. जेव्हा गरम पाण्याच्या संपर्कात मृतदेह येतो, त्यात बॅक्टेरियांच्या वाढीव कारणामुळे वायू वेगाने तयार होण्यास सुरवात होते.

किती तासात एखादा मृतदेह पाण्यावर तरंगतो?

फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञांच्या मते, जर मृतदेहात आधीच गॅस तयार झाला असेल आणि त्याला थंड पाण्यात टाकल्यास तो दो ते अडीच दिवस आतचं बुडलेला असतो. मग जशी मृतदेहाच्या आत गॅस तयार होण्याची प्रक्रिया तीव्र होईल, तसतसे मृत शरीर आपोआप पाण्याच्या वर येईल.

म्हणजे एखादा मृतदेह थंड पाण्यात येऊन पोहण्यास 30 ते 40 तास लागू शकतात. त्याचप्रमाणे गरम पाण्यात बुडलेल्या मृतदेहाला पाण्याच्या वर येण्यासाठी अंदाजे 18 ते 24 तास लागतात.

डॉ. बीएन मिश्रा यांच्या मते, “फॉरेन्सिक विज्ञानाच्या जगात, जर सरळ आणि स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर, मृत शरीराची पाण्याच्या आत राहण्याची आणि बाहेर येण्याची आणि वर येऊन पोहण्याच्या क्षमतेस बायोनसी म्हणतात. परंतु प्रत्येक शरीराची ही क्षमता वेगळी आहे. त्यानुसार हा वेळ किंवा कालावधी कमी जास्त असू शकतो.