7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) आनंदाची बातमी आहे.  

Updated: Jul 14, 2021, 03:49 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ title=

मुंबई : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  दीड कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना (Government Employees And Pensioners) गेल्या काही महिन्यांपासून वाढीव महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलतीत (डीआर) प्रतीक्षेत होते, ती प्रतिक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महागाई भत्ता पुनर्संचयित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या चेहऱ्यांवर पुन्हा हसू उमटलं आहे. (7th Pay Commission Good news for central employees cabinet approved to increase DA to 28 percent)
 
DA मध्ये 11 टक्क्यांची वाढ- सूत्र

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महागाई भत्ता आता केंद्रीय कर्मचार्‍यांना 28 टक्के इतका देण्यात येणार आहे. हा महागाई भत्ता आतापर्यंत  17% मिळत होता. एकूणच केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना आता महागाई भत्त्यात 11%  वाढ मिळाली आहे.

कोरोनामुळे DA स्थगित

कोरोनामुळे केंद्र सरकारने मागील वर्षभरापासून कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर आणि पेन्शनधारकांकडून महागाई सवलत स्थगित करण्यात आली होती. केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी 2020, जुलै 2020, जानेवारी 2021 आणि जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला होता.
 
त्याच वर्षात पुन्हा जून 2020 मध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यानंतर, जानेवारी 2021 मध्ये 4% डीए वाढविण्यात आला. अशा परिस्थितीत एकूण वाढ 11% होती जी आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना उपलब्ध होणार आहे. या 3 थकबाकी कर्मचार्‍यांना तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.

जुलैमध्ये किती DA किती वाढणार? 

जुलैच्या डीएबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. जुलैमध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. असं झालं तर एकूण महागाई भत्ता हा 31% असेल. तसेच केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सप्टेंबरपासून वाढलेला महागाई भत्ता मिळणे सुरू होईल.