मुंबई : आता डिजिटल युग सुरू आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहार हा आपण पैशांशिवायच करतो. परंतु आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात खऱ्या नोटा पाहिल्याच असणार. मग त्यावर तुम्ही कधी आडव्या काळ्या रेषा पाहिलायत का? जर तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, मुल्यानुसार नोटांवरील संख्या बदलते आणि त्यामुळे त्या नोटांवरील कोपऱ्यातील ती डिझाईन पण बदलली जाते. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की या रेषा का मारल्या जातात? याचा नक्की अर्थ काय? तर आज आम्ही तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहोत.
नोटांवरील या रेषांना 'ब्लीड मार्क्स' म्हणतात. या ब्लीड मार्क्स दृष्टिहीनांसाठी बनवल्या जातात. म्हणजेच जे लोक आपल्या डोळ्यांनी पैशांचं मुल्य पाहू शकत नाहीत, त्याच्यासाठी नोटांवर अशा खास पद्धतीने रेषा बनवल्या जातात.
त्यामुळेच 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर वेगवेगळ्या रेषा लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे दृष्टिहीनांसाठी ते ओळखणे सोपं जाईल.
100 रुपयांच्या नोटवर दोन्ही बाजूला चार ओळी असतात, ज्याला स्पर्श केल्याने ही 100 रुपयांची नोट आहे असे दृष्टीहीनांना समजते. त्याच वेळी, 200 रुपयाच्या नोटेच्या दोन्ही बाजूंना चार रेषा आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन शून्य आहेत. तर 500 च्या नोटेवर 5 रेषा आणि 2000 च्या नोटांच्या दोन्ही बाजूला 7-7 रेषा आहेत.
या रेषांच्या मदतीने अंध व्यक्ती कोणतीही नोट आणि तिचे मूल्य सहज ओळखू शकतात.