नवरात्रोत्सवात Condomची विक्री का वाढते? ही दोन कारणं तुम्हाला माहितीयत?

नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या प्रमाणात केल्या जातात

Updated: Oct 3, 2022, 10:38 AM IST
नवरात्रोत्सवात Condomची विक्री का वाढते? ही दोन कारणं तुम्हाला माहितीयत? title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

नवरात्रोत्स (Navratri)सुरु झाल्यापासून देशभरात गरब्याची (Garba) धमाल पाहायला मिळत आहे. नऊ दिवस मौजमजा आणि उत्सवासोबत आणखी बरेच काही घडतं. अशातच नवरात्रीमध्ये निरोधकांच्या (condoms) विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील पण नवरात्रीतच कंडोमच्या (condoms) विक्रीत वाढ खरंच होते का आणि ती का होते यासारखे अनेक प्रश्न सर्वांनाच पडत असतात. काही तज्ज्ञांनी  या मागची काही कारणे सांगितली आहेत.

ऑक्टोबरचा (October) उन्हाळा आणि गरब्याचा हंगाम एकत्र येतो. नवरात्रोत्सवात संध्याकाळचे तापमान थंड होते तशीच संगीत आणि ऑर्केस्ट्राची (orchestra) मजा वाढते. हे कार्यक्रम लोकांसाठी संवाद साधण्याचे आणि तो पुढे नेण्याचे व्यासपीठ बनतात. 

नवरात्रीदरम्यान गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमच्या वाढत्या विक्रीवरून नव्या वादाला कायमच तोंड फुटत आलं आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मात्र नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीची विक्री वाढते हे वास्तव आहे. 

गरबा हा जुन्या परंपरेचे प्रतीक आहे. नवरात्रीत गरबा आणि दांडियाचा विशेष संबंध असतो. या दरम्यान मुले-मुली वेशभूषा करून गरबा मंडपात जातात. प्रत्येकाचे कपडे इतरांपेक्षा वेगळे असतात. काही वेळा मोकळेपणाचे तरुण तरुणी नवीन जोडीदाराच्या शोधात येतात. कोणीही कोणाशीही गरबा खेळू शकतो, कोणतेही बंधन नाही. दांडियाच्या बहाण्याने संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणे आणि पहाटे घरी परतण्याचे प्रकारही पाहायला मिळतात. नऊ दिवस तरुणांचा हा दिनक्रम ठरलेला आहे. या नऊ दिवसांच्या रात्रीच्या अंधारात अनेक जुनी नाती तुटून नवीन नाती आणि नवे मित्र तयार होतात.

अशा वेळी काही सर्वेक्षणांमधून कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची माहिती समोर आलीय. यासोबतच गर्भनिरोधक गोळ्या आणि प्रायव्हेट डिटेक्टिव यांच्याही संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. सिनेमांमध्ये गरब्याच्या सीनमध्ये अभिनेता अभिनेत्रीमध्ये दाखवेली जवळीक ही तरुणांच्या मनावरही छाप पाडते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये वाढणारी थंडी आणि रात्री हवेत निर्माण होणारा गारवा यामुळे तरुण तरुणी आपसूनकच जवळ येतात.  याकाळात होणारे हार्मोन्समधील बदल आणि रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी यामुळे ही जवळीक वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे सुरक्षित लैंगित संबंध ठेवण्यासाठी तरुणाईकडून कंडोमचा वापर केला जातो.

माध्यमांच्या वृत्तानुसार, नवरात्रीमध्येच गरब्यादरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री 50 टक्क्यांनी वाढते.  विशेषतः गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये विक्री 60 टक्क्यांनी वाढल्याचे अनेकांचे मत आहे. या काळात तरुणीही दुकानातून गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास धजावत नाहीत.