प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तर आजच्या युगात एका यशस्वी महिलेमागे तेवढ्याच भक्कमपणे तिला साथ देणारा नवरा ही आपण पाहिला आहे. आज आपण अशा नवरा बायकोबद्दल जाणून घेणार आहोत. पत्नीच्या एका सल्ल्याने तो दररोज 50000000 रुपये कमवतो. तो जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून श्रीमंताच्या यादीत त्याची नोंद होते. आम्ही बोलत आहोत गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबद्दल. त्यांची पत्नी अंजली पिचाई याचा सुंदर यांच्या यशात मोलाचा वाटा आहे. अंजली यांच्या एका सल्ल्यामुळे त्यांचं आयुष्यच पालटलं.
अंजली या राजस्थानमधील कोटामधील असून त्यांची सुंदर यांच्याशी भेट आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना झाली. जिथे अंजलीने केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. विद्यापिठाच्या काळात त्यांचा मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपातंर नंतर प्रेमात झालं. पदवी प्राप्त केल्यानंतर, अंजलीने तिची कारकीर्द Accenture मध्ये सुरू केली. जिथे तिने तीन वर्षे काम केले आणि नंतर Intuit मध्ये पुढचा प्रवास सुरु केला. जिथे ती सध्या बिझनेस ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरथ आहे.
2022 मध्ये ₹1,869 कोटींच्या भरपाई पॅकेजसह ₹1,800 कोटींहून अधिक वार्षिक पगार मिळवणारे सुंदर पिचाई हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत. ज्यामुळे ते जागतिक स्तरावर सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ बनले आहेत. त्यांची रोजची कमाई 5 कोटींहून अधिक आहे. Twitter आणि Yahoo सारख्या मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळाल्यानंतरही, सुंदर यांनी गुगलची साथ सोडली नाही. यामागे कारणही अंजलीचा एक सल्ला होता. अंजलीने सुंदर यांना Google सोबत राहण्याचा आग्रह केला. या निर्णयामुळे ते त्याच्या कारकिर्दीत उंचीवर पोहोचले आहेत.
जेव्हा सुंदर पिचाई त्यांच्या कारकिर्दीसाठी यूएसला गेले तेव्हा या जोडप्याला सुरुवातीच्या काळात महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागला होता. त्यावेळी लांब पल्ल्याच्या कॉल्सच्या भरपूर पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे त्यांचा फार संपर्क होत नव्हता. त्यांना अनेक बंधनांचा सामना करावा लागला पण त्यांचं नातं या काळात अधिक मजबूत झालं. अंजलीच्या पाठिंब्याने आणि सल्ल्याने सुंदर यांनी करिअरच्या कठीण निवडी करण्यात मदत झाली. ज्यामुळे ते गंभीर क्षणांमध्ये Google सोबत राहिले.
सुंदरने गुगलच्या वाढीवर देखरेख केली आहे. सुंंदर यांच्या नेतृत्त्वात कंपनीच्या स्टॉकमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झाल्याच पाहिला मिळालं. AI च्या वाढीसह, Google ने त्याची निव्वळ संपत्ती आता $1 अब्ज म्हणजे ₹8,342 कोटींचा टप्पा गाठलाय आणि त्यांना अब्जाधीश होण्याच्या मार्गावर आणलंय. सुंदर पिचाई हे जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनचा चेहरा असून, अंजलीचा शांत पण प्रभाव त्याच्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी निर्णायक ठरला आहे. ज्यामुळे अंजली या त्याच्या यशोगाथेचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.