भोपाळ : मध्य प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात विशेष पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम शर्मा यांना सरकारने पदावरून हटवले आहे. काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुरुषोत्तम शर्मा यांच्या विरूद्ध कडक कारवाई करत शर्मा यांना पदावरून दूर केलं आहे.
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says a senior IPS officer has been relieved of duties after a video of the cop purportedly assaulting his wife went viral on social media
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2020
पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम शर्मा यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते एका महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. महिलेला मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये ते ज्या महिलेला मारहाण करत आहेत ती महिला त्यांची पत्नी असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे पुरुषोत्तम शर्मा यांचं नावं चर्चेत आलं. अखेर मध्यप्रदेश सरकारने पुरुषोत्तम शर्मा यांच्या विरूद्ध कडक कारवाई केली असून सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.