मित्राला घरी बोलवून दारू पार्टी करायचा, त्याच्यासोबतच बायकोने केले अफेअर, शेवटी घडलं...

Wife Boyfriend Killed Her Husband: मित्राला घरी बोलवून दारू पार्टी करायचा त्यानेच दगा दिला. पत्नीने पतीच्या मित्रासोबतच अफेअर केले शेवटी नको ते घडलं   

Updated: Jun 10, 2023, 02:35 PM IST
 मित्राला घरी बोलवून दारू पार्टी करायचा, त्याच्यासोबतच बायकोने केले अफेअर, शेवटी घडलं...  title=
Wife lover arrested for killing husband in up

Wife Boyfriend Killed Her Husband: उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचे पतीच्या मित्रावर प्रेम बसले. दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. पत्नीसोबत झालेल्या भांडणात त्याने तिच्यावर हात उचलला याचा राग मनात धरुन तिच्या प्रियकराने मित्राची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

मित्राच्या पत्नीसोबतच अफेअर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शर्मा नावाचा व्यक्ती त्याची पत्नी व तीन मुलांसह मजदूरी करुन घर चालवत होता. त्याचदरम्यान कामाच्या ठिकाणी त्याची ओळख सागीर नावाच्या युवकासोबत झाली. त्यानंतर सागीर आणि राजू यांच्यात मैत्री झाली. सागीर नेहमी त्याच्या घरी येत जात असे. दोघंही घरी दारुची पार्टीदेखील करत होते. त्याचवेळी सागीरचे राजूच्या पत्नीवर प्रेम बसलं दोघांचेही अफेअर सुरू झाले. 

पती-पत्नीचे भांडण

सागीरचं राजूच्या घरी येणं-जाणं वाढलं होतं. एक महिन्यांपूर्वी राजू आणि त्याच्या पत्नीचे एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. तेव्हा रागात त्याने तिच्यावर हात उचलला. जेव्हा ही गोष्ट सागीरला कळली तेव्हा तो संतापला. रागाच्या भरात त्याने राजूचा काटा काढण्याचा प्लान रचला. 

पत्नीच्या ओढणीने गळा घोटला

८ जून रोजी सागीर राजूची पत्नी आणि तिच्या तीन मुलांना जत्रेत फिरवण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला होता. नंतर त्यांना एके ठिकाणी सोडून तो पुन्हा राजूच्या घरी आला व त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे तोंड दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलं. मात्र त्याचा तो प्रयत्न फसला तेव्हा त्याने राजूच्या पत्नीच्या ओढणीने त्याचा गळा घोटला आणि तेथून निघून गेला. 

शेजाऱ्यांनी दिली माहिती

सकाळी शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी घरात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे पोलिसांना सांगितले.  पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी  शेजाऱ्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना सागीर आणि राजूच्या पत्नीविषयी कळलं. पोलिसांनी त्यांनी तपासाची दिशा फिरवत दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दोघांचाही कसून तपास केल्यानंतर त्यांनी जबाबात आपणच त्याची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  तपासात मयत तरुणाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने दोघांनी मिळून हा कट रचल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.