जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते... तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ

जंगलातील कोणत्या प्राण्याची कधी शिकार होईल हे सांगता येणं फार कठीण आहे.

Updated: Apr 4, 2022, 06:46 PM IST
जेव्हा मगर कासवाला आपलं भक्ष्य बनवते...  तुम्हाला काय वाटतं, पुढे काय घडलं असावं? पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे जणू ज्ञानाचा खजिनाच. येथे आपल्याला मनोरंजनासाठी बरेच व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु येथे असे अनेक व्हिडीओ देखील असतात. जे आपल्याला बरंच काही शिकवतात किंवा माहिती देतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट या व्हिडीओसोबतच वाईल्ड लाईफ व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडते. जंगलातील प्राण्यांचे असे बरेच व्हिडीओ समोर येतात जे आपल्या अंगावर काट आणतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो एका मगरीचा आणि कासवाचा आहे.

जंगलातील कोणत्या प्राण्याची कधी शिकार होईल हे कोणालाही सांगता येणं कठीण आहे. जंगलातील हा नियमच आहे की, मोठे प्राणी हे लहान प्राण्यांना भक्ष्य बनवतात आणि आपले पोट भरतात.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कासव मगरीच्या तोंडात आहे. खरंत या मगरीने कासवाला आपलं भक्ष्य बनवलं आहे, ज्यामुळे ती कासवाला खाण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्या सगळ्यांना तर हे माहित आहे की, मगर ही अशी जलचर आहे की, तिच्या तोंडात कोणी अडकलं तर तो संपलाच म्हणून समजावा. परंतु यावेळेला मगरीने कासवाला आपलं भक्ष्य बनवलं आहे. परंतु तिला कदाचित हे माहित नसावं की, तिला कासवालं खाणं सहजासहजी शक्य होणार नाही. कारण त्याचं कवच त्याचं नेहमीच रक्षण करत असतं.

ज्यामुळे मगर कासवाला खाण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु त्याला खणं तिला शक्य होत नाही. ज्यानंतर अखेर कासव मगरीच्या तोंडातून खाली पडतो आणि तेथून निघूण जाण्याचा प्रयत्न करतो आणि मगर फक्त पाहातच राहाते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच पाहिला जात आहे. एवढेच काय लोक या व्हिडीओला एकमेकांना शेअर देखील करत आहे.

हा व्हिडीओ scienceturkiyeofficial नावाच्या सोशल इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.