आसाम : मतदान करताना नोटा म्हणजेच 'या पैकी कोणतेही नाही' हा पर्याय EVM मध्ये तुम्ही पाहिल्या असणार. काही लोकांनी ते बटण देखील दाबले असणार. परंतु आपल्यापैकी अनेक लोकं असा विचार करत असणार की, या पर्यायाचा उपयोग काय? जे कोणी हा पर्याय निवडत असणार त्यांचे मत तर वायाच जाते, मग हा पर्याय का निवडावा? परंतु आसाम निवडणुकीच्या रीझल्ट वरुन तुम्हाला या पर्यायाचे महत्व कळेल.
आसाममध्ये नोटाचा पर्याय सर्व राजकीय पक्षांसाठी एक मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. आसाम विधानसभा निवडणुकीत नोटा पर्यायामुळे अगदी कमीत फरकाने पाच उमेदवारांना जिंकण्यास मदत झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालांनुसार, नजीरा, बहामपूर, बिजनी, दुधोई आणि तोक मतदारसंघात नोटाच्या मतांपेक्षा विजयी उमेदवारांना दिलेले मतांमधील अंतर अगदी कमी आहे.
या निवडणुकीत नजीरा मतदारसंघात (Nazira) काँग्रेसचे उमेदवार देवव्रत सैकिया यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मयूर बोरगोहिण यांना 683 मतांच्या फरकाने पराभूत केले. देवव्रत सैकिया यांना 52 हजार 387 मते मिळाली, तर मयूर यांना 51 हजार 704 आणि नोटाला 1 हजार 470 मते मिळाली. त्याचप्रमाणे बारहामपूर विधानसभा जागेवर (Barhampur) भाजपचे उमेदवार जीतू गोस्वामी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश बोरा यांचा 751 मतांनी पराभव केला. येथे नोटा पर्यायाला येथे 1 हजार 291 मते मिळाली.
बिजनी मतदारसंघात (Bijni) BPF चे उमेदवार कमलसिंग नरजारी हे 1 हजार 003 मतांच्या फरकाने निवडणूक हरले, तर भाजपचे उमेदवार अजय कुमार हे 45 हजार 733 मतांनी विजयी झाले. नोटा पर्यायाला येथे 1 हजार 388 मते मिळाली. तोक मतदारसंघात (Teok) AGP उमेदवार रेणूपोमा राजखोवा यांनी 1 हजार 350 मतांच्या फरकाने विजय मिळविला, तेथे कँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पल्लबी गोगोई यांना, 46 हजार205 मते मिळाली, परंतु नोटा पर्यायात 1 हजार 927 मते नोंदविण्यात आली आहे.
नोटा किंवा 'वरीलपैकी कोणतेही नाही' हा पर्याय 2013 मध्ये भारतीय मतदारांना देण्यात आला आहे. नोटाच्या वापरामुळे कोणताही मतदार, निवडणूक लढविणार्या कोणत्याही उमेदवाराचा 'वरीलपैकी कोणतेही नाही' हा पर्याय निवडू शकतो. निवडणूक आयोगाच्या निकालांनुसार 2021 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 19 हजार 578 मतदारांनी नोटा पर्याय निवडला.
सत्ताधारी भाजपने 60 जागा जिंकून सत्तेत परत प्रवेश केला, तर त्याचे सहयोगी AGP नऊ आणि UPPL ने सहा जागा जिंकल्या. विरोधी कॉंग्रेसने 29 जागा जिंकल्या, तर त्याच्या सहयोगी AIUDF ला 16, BPF ला 4 आणि CPI (M)ला 1 जागा मिळाली आहे.
वरील अंकांमधील फरक पाहूण तुम्हाला कळलंच असेल की, नोटामुळे सत्ता कशी बदलू शकते ती.