लडाख : 'भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्या टप्प्याने दोन्ही देश सैन्य मागे घेणार असल्याचं आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती दिली. सीमा विवादानंतर दोन्ही देशांचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पण एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही. असं देखील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं आहे.
#WATCH: Indian Army video of ongoing disengagement process in Ladakh. pic.twitter.com/kXjr0SiPN2
— ANI (@ANI) February 11, 2021
भारत चीन सीमा संघर्ष निवळत आहे. भारत चीन सीमेवरील पँगाँग लेक परिसरातून दोन्ही सैन्य माघार घेत आहे. चिनी संरक्षण मंत्रालयाकडून काल सैन्य मागे घेत असल्याचं जाहीर कऱण्यात आलं. त्यानंतर आज संरक्षणमंत्र्यांनी राज्यसभेत यासंदर्भात निवेदन दिलं आहे. यावेळी सीमा भागात अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न झाला मात्र एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नसल्याचं वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी केलं.