भाऊ असल्याचं सांगून पत्नी प्रियकराला घरी आणायची अन्...; पतीची धक्कादायक Suicide Note

woman calls her lover as brother used to give poison to husband wrote in suicide note: मृत्यूनंतर माझ्या मुलाला आणि कुटुंबाला मदत करा असं आवाहन या व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये केलं आहे.

Updated: Feb 14, 2023, 03:11 PM IST
भाऊ असल्याचं सांगून पत्नी प्रियकराला घरी आणायची अन्...; पतीची धक्कादायक Suicide Note title=
give poison to husband wrote in suicide note

woman calls her lover as brother used to give poison to husband wrote in suicide note: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये आत्महत्येचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लसूडिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना एक सुसाइड नोट (suicide note) सापडली. या चिठ्ठीमध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख केला आहे.

अनेकदा दोघांना रंगेहाथ पकडलं

पोलीस स्टेशनच्या अख्त्यारित येणाऱ्या महालक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या हितेश पालने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करम्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये हितेशने, "माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठोडबरोबर विवाहबाह्यसंबंध आहेत. हे दोघेही मला संपवण्याची धमकी देत आहेत. ती त्याला घरीही आणायची. मी अनेकदा या दोघांना रंगेहाथ पकडलं आहे. नीतू घरी तंत्र-मंत्रही करते. काही दिवसांपूर्वी मी नीतू आणि कृष्णाला गार्डनमध्ये एकत्र पकडलं होतं," असं म्हटलं आहे.

तो भाऊ असल्याचं सांगून त्याला भेट दिली कार...

"एक अन्य महिलाही तिला (नितूला) यामध्ये मदत करायची. या महिलेचं नाव रानी उदासी असं आहे. नीतू आणि कृष्णाच्या व्हॉट्सअप चॅटवर मी मागील काही दिवसांपासून लक्ष देऊन होतो. या चॅटमधून मला हे ही समजलं की गार्डनमध्ये भेटल्यानंतर नीतू कृष्णाच्या रुमवर जात होती. ती कृष्णाला महागड्या भेटवस्तू द्यायची. मला सांगायची की माझा भाऊ आहे. भाऊ असल्याचं कारण देत ती त्याला पैसेही द्यायची. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा नीलूने काही दिवसांपूर्वी तिचा प्रियकर असलेल्या कृष्णाला चक्क कार भेट दिली. ही कार नितूच्या नावावर आहे," असा उल्लेखही हितेशच्या पत्रात आहे.

मला स्लो पॉयझन देतात

हितेशने या चिठ्ठीमध्ये नीतू, कृष्णा आणि रानी हे तिघे मिळून घरात मंत्र-तंत्रही करायचे असं म्हटलं आहे. "मागील एका वर्षांपासून मला स्लो पॉयझन देत आहेत. याच कारणामुळे मी सुस्त राहू लागतो. माझं संपूर्ण शरीर काळं पडलं आहे. हे सर्व पोस्टमार्टममध्ये समजेल. पोलीस प्रशासनाला निवेदन आहे की या सर्वांचे चॅट तपासून पहावेत आणि त्यांना शिक्षा कारवी," असा उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये आहे.

हे तिघेच माझ्या मृत्यूला कारणीभूत 

हितेशने या पत्रात पत्नीने आपल्याला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण संपत्ती स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचंही म्हटलं आहे. "माझ्या मृत्यूनंतर मुलगा युवराज आणि आई-वडिलांना ही संपत्ती दिली जावी. तिला मला ठार मारायचं आहे. त्यामुळेच तिने सर्व ठिकाणी नॉमिनी म्हणून स्वत:चं नाव टाकलं आहे. माझ्या मृत्यूचे जबाबदार हे तिघेजण आहेत," असंही या चिठ्ठीत म्हटलं आहे.

मुलाला आणि कुटुंबाला मदत करा

आत्महत्या करणाऱ्या हितेशने सुसाईड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसेच त्याने काही लोकांचे आभार मानले असून मृत्यूनंतर कुटुंबाची आणि मुलाची मदत करावी अशी मागणीही केली आहे. तपास अधिकारी बी. एस. कुमरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे विवाहबाह्यसंबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून पोस्टमॉर्टमचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.