VIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी

Woman Dance Video : अजमेर दर्गा शरीफच्या आवारात एका महिलेचा डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दर्गा आवारात असा डान्स करताना महिलेचा हा पहिला व्हिडीओ नाही, पूर्वीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

Updated: Jun 28, 2023, 03:43 PM IST
VIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी title=
woman caught dancing in hazrat khwaja angers dargah khadims video get viral on Social media Trending video today google news

Ajmer Viral Video : सोशल मीडियावर अजमेर शरीफ दर्ग्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एक महिला दर्ग्याच्या आवारात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या घटनेनंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यापूर्वीही एका महिलेने अजमेर शरीफ दर्ग्यात डान्स केला होता. त्यानंतर धार्मिक स्थळावर असं कृत्य केल्यामुळे नाराजीचा सूर पसरला होता. 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या अनोळखी महिलेने धार्मिक स्थळाच्या नियमाचं पालन केलं नाही म्हणून टीका करण्यात आली आहे. सूफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (woman caught dancing in hazrat khwaja angers dargah khadims video get viral on Social media Trending video today google news)

काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला अचानक कानाला इयरफोन लावून जबदस्त नाचायला लागली. ही महिला कोण आहे कुठून आली याबद्दल अद्याप काही समजलं नाही आहे. आठवडाभरात दर्ग्या आवारातील हा तिसरा व्हिडीओ आहे.  पहिला व्हिडीओ हा केरळमधील होता. 

या महिलेने सोशल मीडियावर रील शेअर करण्यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. 15 सेकंदाचा रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमुळे एकच वाद निर्माण झाला आहे. 

हा व्हिडीओ दोन तीन दिवसांमधीलच असल्याचं बोलं जातं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दर्गाह खादिम म्हणाले की, अजमेर शरीफ ख्वाजा यांच्या दरबाराता सर्व धर्माची लोक येत असतात. हे आमचं श्रद्धा स्थान आहे. त्यामुळे अशाप्रकारे निष्काळजीपणाचं कृत्य इथे होता कामा नये. 

दर्गा समितीने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. महिलेचा शोध घेण्यात येतं आहे. तर तिच्यावर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. 

 

हेसुद्धा वाचा - 5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

 

अजमेर शरीफ दर्ग्याला सेलिब्रिटी चादर चढविण्यासाठी जातात. याठिकाणी आपली इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे.  दरम्यान गुरुवारी बकरी ईद म्हणजेच ईद अल अजहा देशभरात साजरा करण्यात येणार आहे.