इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) गाझामधून सुटका केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, यझिदी महिला फौझिया अमीन सिडो यांनी आयसीसीच्या कैदेत असताना कशाप्रकारे अत्याचार करण्यात आला याचं वर्णन केलं आहे. फौझिया अमीन सिडो यांनी सांगितलं की, कशाप्रकारे वयाच्या नवव्या वर्षी तिला तिच्या भावांसह पकडण्यात आले आणि सिंजर ते ताल अफारपर्यंत कूच करण्यास भाग पाडलं. तांदूळ आणि मांस खायला देण्यापूर्वी या सर्वांना तीन दिवस उपाशी ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांना हे मांस याझिदी लहान बाळांचं होतं.
"त्यांनी भात केला आणि त्याच्यासह मांस खाण्यास दिलं. त्या मांसाची चव फार भलतीच होती. आमच्यातील काहींच्या पोटातही दुखू लागलं होतं," असं फौझिया अमीन सिडो यांनी Jerusalem Post ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "जेव्हा आमचं जेवून झालं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, हे याझिदी बाळांचं मांस होतं. त्यांनी आम्हाला मुंडकं छाटलेल्या बाळांचे फोटो दाखवले आणि म्हणाले, तुम्ही जे मांस खात आहात ते या बाळांचं आहे".
"यानंतर एका महिलेला इतका धक्का बसला की तिला ह्रदयविकाराच झटका आला आणि मृत्यू झाला," असं फौझिया अमीन सिडो यांनी सांगितलं. एका महिलेने हातांवरुन यामध्ये आपलही बाळ होतं हे ओळखलं अशी माहितीही तिने दिली. "त्यांना आमच्यावर जबरदस्ती केली. पण हे झालं यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण त्यावेळी आमच्या हातात काही नव्हतं," अशी खंतही तिने मांडली
2014 मध्ये आयसीसने दहशतवादाच्या काळात गुलाम बनवलेल्या अनेक यझिदी महिलांपैकी फौझिया सिदो एक होत्या. उत्तर इराकमधील याझिदी या धार्मिक अल्पसंख्याकांना अकल्पनीय भयावहतेचा सामना करावा लागला.
आयसीस ओलीस ठेवलेल्या बंदिस्तांना मानवी मांस खाण्यासाठी देत असल्याचे आरोप याआधी अनेकदा झाले आहेत. पण यझिदी खासदार वियान दाखिल यांनी 2017 मध्ये हा प्रकार समोर आणला होता. फौझिया अमीन सिडो यांनी केलेला खुलासा आता याची पुष्टी करत आहे.
फौजिया सिदो यांना फक्त मानवी मांसच खावं लागलं नाही. तिला 200 इतर यझिदी महिला आणि मुलांसमवेत भूमिगत तुरुंगात नऊ महिने बंदिवासात ठेवण्यात आले होते. दूषित पाण्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाला. सिदो यांना अबू अमर अल-मकदिसीसह अनेक जिहादींना विकण्यात आलं होतं. ज्यापासून तिला दोन मुले होती.
अनेक वर्षांच्या बंदिवासानंतर अमेरिकेच्या दुतावासासह संयुक्त कारवाईत आयडीएफने तिची सुटका केली आणि इराकमधील तिच्या कुटुंबाकडे परत आली. तथापि, तिची मुलं तिच्या कैद करणाऱ्याच्या कुटुंबासह गाझामध्ये राहतात, जिथे त्यांचे संगोपन अरब मुस्लिम म्हणून केलं जात आहे.
मी इराकला परत येईपर्यंत, मी गाझामध्येही 'सबाया' होतो. बंदिवासात ठेवलेल्या आणि लैंगिक शोषण केलेल्या महिलांसाठी हा शब्द वापरला जातात अशी माहिती तिने दिली.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.