...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं!

जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

Updated: Oct 14, 2017, 11:42 PM IST
...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये गर्दीनं पोलिसालाच खुर्चीला बांधून ठेवलं! title=

जम्मू : जम्मू - काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची घटना घडलीय. एका महिलेचे तिच्या परवानगीशिवाय फोटो घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. 

गंडेरबल भागात एका महिलेच्या परवानगीशिवाय हा पोलीस अधिकारी तिचं आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करत होता. हे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेनं रितसर पोलिसांत आपली तक्रार दाखल केली. 

परंतु, याआधीच या पोलिसाला स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. स्थानिकांनी या पोलिसाला पकडून खुर्चीला बांधून ठेवल्याचं वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून महिलेचे फोटोही हस्तगत करण्यात आलेत.