केवळ स्त्रीयाच करु शकतात ही गोष्टी, महिलेकडून पुरुषांना चॅलेंज, पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेनं पुरुषांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यामध्ये या महिलेनं असा दावा केला आहे की, ती किंवा महिला जे करु शकतात, ते पुरुषांना करणं शक्य नाही.

Updated: Jun 5, 2022, 10:22 PM IST
केवळ स्त्रीयाच करु शकतात ही गोष्टी, महिलेकडून पुरुषांना चॅलेंज, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : जगाच्या बहुतांश भागात महिला पुढे आल्या आहेत. मग ते शिक्षण असो, नोकरी असो किंवा व्यवसाय महिला अव्वलं स्थानी आहेत. सुरुवातीच्या काळात महिलांना नेहमी कमी लेखलं जायचं किंवा त्यांच्या मानसिक आणि शारीरीक गोष्टींमध्ये कमी लेखलं जात होतं. परंतु त्यानंतर स्त्रीयांनी देखील कंबर कसली आणि सर्वांना हे दाखवून दिलं की, त्यांनी ठरवलं तर त्या काहीही करु शकतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत, असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेनं पुरुषांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यामध्ये या महिलेनं असा दावा केला आहे की, ती किंवा महिला जे करु शकतात, ते पुरुषांना करणं शक्य नाही.

@TansuYegen नावाच्या युजरने सोशल मीडिया साइट ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून लोक आश्चर्यचकित करत आहे.

वास्तविक, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये महिला एक खास प्रकारची युक्ती करताना दिसत आहेत, जी पुरुष करू शकत नाहीत. हे पाहणे खूप सोपे आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही, युक्ती एकाही पुरुषाला करणं शक्य नाही.

हे चॅलेंज काय आहे?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, प्रथम एक महिला ही युक्ती करताना दिसत आहे आणि नंतर इतरांना ते पुन्हा करण्यास सांगते. या यामध्ये महिला प्रथम भिंतीकडे तोंड करून उभी असते. मग ती दोन पावले मागे जाते आणि पुढे झुकते आणि तिचे डोके भिंतीवर टेकवते.

यानंतर, ती तिथे ठेवलेली खुर्ची भिंतीच्या आणि स्वतःच्या मधल्या रिकाम्या जागेत सरकवते आणि खुर्चीला दोन्ही हातांनी धरून ती तिच्या छातीजवळ आणते. मग ती तशीच सरळ उभी राहतो.

ही युक्ती पाहण्यास अतिशय सोपी दिसते. परंतु पुरुषांसाठी ते अशक्य असल्याचे सिद्ध झाले. जिथे एका बाजूला महिला ही युक्ती करून खुर्ची उचलून सरळ उभी होते. त्याच वेळी, पुरुषांना खुर्ची वर उचलता येत नव्हते.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरती भलताच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक लोक एकमेकांना असं करण्याचं चॅलेंज देत आहेत.