ब्राझिल : ब्राझिलमधून एक विचित्रच घटना समोर आली आहे. एका तरूणीने बाहूल्याशी लग्न केल्याची घटना घडलीय. तिच्यामते तोचं तिचा आता जीवनसाथी असणार आहे. या बाहूल्यापासून ती प्रेग्नेंट झाल्याचाही दावा करतेय. या घटनेमुळे सर्वंच चक्रावले आहेत. त्यामुळे ही घटना काय आहे ते जाणून घेऊयात.
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या महिलेचे नाव मॅरिव्होन रोका मोरेस (३७) असे आहे. मेरिव्हॉनने तिच्या आईला सांगितले की ती अविवाहित आहे. डान्स पार्टनर नसल्यामुळेही ती नाराज असते. मुलीची नाराजी घालावण्यासाठी तिच्या आईने तिच्यासाठी कापडी बाहुला बनवला होता, याचे नाव मार्सेलो ठेवण्यात आले होते.
मेरिव्हॉनने या बाहूल्यावर म्हणते की, 'जेव्हा माझ्या आईने मार्सेलो (बाहुली) पहिल्यांदा दाखवली तेव्हा मी त्याच्या प्रेमातचं पडली. मी डान्सर आहे. अनेकदा डान्स करण्यासाठी जायची त्यावेळेस माझ्याकडे जोडीदार नसायचा, पण आता (मार्सेलो) माझ्या आयुष्यात आल्याचे ती म्हणते. 'तो असाच माणूस आहे ज्याची मला माझ्या आयुष्यात नेहमीच इच्छा होती, असेही ती पुढे म्हणते.
तरूणी प्रेग्नेंट
मीडिया रिपोर्टनुसार, मेरिव्हॉनची मार्सेलोशी ज्या दिवसापासून पहिली भेट झाली त्या दिवसापासून ती त्याच्या प्रेमात होती. मेरिव्हॉनने या मार्सेलो बाहूल्यासोबत अनेक महिने एकत्र घालवले होते. यानंतर मेरिव्हॉन प्रेग्नेंट असल्याची बातमी आली. 'हे खरे आहे, मार्सेलोने मला गर्भधारणा केली. मी गर्भधारणा चाचणी केली आणि ती सकारात्मक आली, असा दावा मेरिव्हॉनने केला आहे.
लग्नाला 250 पाहूण्यांची उपस्थिती
एकमेकांसोबत लग्न करण्याबाबत मेरिव्हॉन म्हणते की, लग्नाचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. या जोडप्याच्या लग्नात 250 पाहुणे उपस्थित होते. त्यानंतर या जोडप्याने रिओ डी जनेरियो येथील बीच हाऊसमध्ये आठवडाभर हनिमून साजरा केला.लग्नानंतर मार्सेलोसोबत लग्नाची रात्र घालवल्याचेही ती म्हणते.
मुलाचा दिला जन्म
हनिमूननंतर या जोडप्याने २१ मे रोजी 'डॉल चाइल्ड' मार्सिन्होला जन्म दिल्याचा दावा मेरिव्हॉनने केला आहे. त्यांनी लाइव्हस्ट्रीमिंगद्वारे बाहुलीचा जन्म दाखवला होता, या लाईव्हला 200 लोकांनी पाहिले.
दरम्यान या घटनेवरून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच अनेकांनी तिच्या कुटूंबियाला खोटो म्हटले आहे. तिच्या कुटुंबाला खोटे म्हणणाऱ्या लोकांचा ती तिरस्कार करते.