गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या महिलेला भावना आवरेना... सासु आणि नवऱ्याला व्हावं लागलं लाजिरवाणं

या महिलेनं गाण्याचा जो काही ठेका धरला, त्यानंतर ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली आहे.

Updated: Mar 4, 2022, 10:25 PM IST
गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या महिलेला भावना आवरेना... सासु आणि नवऱ्याला व्हावं लागलं लाजिरवाणं title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्ध होईल सांगू शकत नाहीत. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. जे तुमचे मनोरंजन करेल. सोशल मीडिया हा मनोरंजक आणि मजेदार व्हिडीओंचा खजिना आहे. यादरम्यान असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक महिला गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ही महिला ज्या विचित्र प्रकारे डान्स करत आहे. ते पाहून तिच्या सासू आणि नवऱ्यालाही लाजिरवाणं वाटलंय, ज्यामुळे ते दोघेही तिला थांबवण्याचा आणि तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ एका गावातील आहे. ज्यामध्ये एक साडी नेसलेली महिला जोशात नाचत आहे.

या महिलेनं गाण्याचा जो काही ठेका धरला, त्यानंतर ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली आहे. ही महिला नुसतीच नाचत नव्हती, तर ती एक्सप्रेशन देऊन डान्स करत होती. जे पाहाताना थोडं विचित्र आणि अश्लिल वाटत आहे. ज्यामुळे या महिलेला थांबवण्यासाठी तिची सासु आणि तिचा नवरा थांबवण्यासाठी आला. परंतु ती काही थांबण्याचं नाव घेत नाहीय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या महिलेचा असा डान्स पाहून बरीच लोक जमा झाली आहेत. त्यांपैकी काही लोकांनी तिचा हा डान्स आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

ती महिला दारूच्या नशेत होती की, तिला काही झाले आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही लोक असेही म्हणत आहेत की, ती फक्त मजा करत होती.  हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर घंटा नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जो अनेकदा ट्रेंडिंग मीम्स आणि व्हायरल व्हिडिओ शेअर करतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे

सोशल मीडियावर हा क्रेझी डान्स व्हिडीओ पाहून एकमेकांना शेअर करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, 'कच्चा बदाम 100 व्यांदा ऐकल्यानंतर असेच काही होईल.' तर दुसऱ्याने 'ती महिला नशेत आहे का?' असे देखील प्रश्न उपस्थीत केला आहे