जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, 8 रुपयांच्या पेनने मुलाने लिहिली मोत्यासारखी अक्षरं... Video पाहून प्रेमात पडाल

World Best Handwriting : देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो. काही जणं चांगलं गातात, काही जणं चांगलं नाचतात, काही जणं सुंदर चित्र काढतात अशा अनेक कला लोकांमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात या मुलाची कला पाहून युजर्स हैराण झाले आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 14, 2024, 06:50 PM IST
जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, 8 रुपयांच्या पेनने मुलाने लिहिली मोत्यासारखी अक्षरं... Video पाहून प्रेमात पडाल title=

World Best Handwriting : शालेय जीवनात प्रत्येकाला सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी शिक्षकांकडून प्रोत्साहन दिलं जातं. आतापर्यंत आपण अनेक वेळा सुंदर हस्तक्षार (Beautiful Handwriting) पाहिलं असेल. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतोय. यात एका मुलाचं हस्ताक्षर पाहून युजर्स या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. हा व्हिडिओ वारंवार पाहिला जात असून या मुलाचं अक्षर पाहून कॉम्प्यूटवर टाईप केल्याचा भास होतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

अगदी साध्या पेनने या मुलाने कागदावर मोत्यासारखी अक्षरं उमटवली आहेत. Pradip000 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या मुलाने आपल्या हस्ताक्षराचं व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत हा मुलगा कागदावर इंग्लिशमध्ये एक पॅरा लिहिताना दिसत आहे. त्याचं प्रत्येक अक्षर वळणदार आणि मोत्यासारखं सुंदर आहे. अगदी सफाईदारपणे तो इतक्या सुवाच्च आणि वळणदार अक्षराने लिहित असल्याचं पाहून पाहाणारेही हैराण होत आहेत. हिरव्या रंगाच्या पेनने हा मुलगा कागदावर इंग्रजीत लिहिताना दिसतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pradip000 (@prodip0000)

7 कोटीहून जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ
सुंदर हस्ताक्षराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत 7 कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 24 लाख लोकांनी या व्हिडिओ लाईक केला आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने म्हटलंय या हस्ताक्षरासमोर AI देखील फेल आहे. तर एका युजरने गमतीत 'ये हाथ मुझे दे दे ठाकुर' असं म्हटलं आहे. अनेक लोकांनी हा मुलगा लिहिण्यासाठी कोणता पेन वापरता असा प्रश्न विचारला आहे. यावर मुलानेही उत्तर दिलं आहे. आपण जो पेन वापरतो तो जेल पेन आहे. 25 पेनचा सेट 203 रुपयात ऑनलाईन मागवला होता असं म्हटलं आहे. म्हणजे एक पेन 8 रुपयांचा आहे. लोकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे.