WWE Superstar John Cena in India : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिम आता शेवटच्या टप्प्यावर आहे. चांद्रयान आता चंद्रावर गृहप्रवेश करणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देशभर नव्हे तर जगभरातील भारतीय चांद्रयानासाठी प्राथर्ना करताना दिसत आहेत. कोण होमहवन करतंय, तर कोणी नमाज पठण करताना दिसत आहे. अशातच आता अनेक सेलिब्रेटी देखील पोस्ट करत इस्त्रोला (ISRO) शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच आता डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीनाने (John Cena) देखील एक पोस्ट केली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्याचं पहायला मिळतंय.
डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना (John Cena) याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने भारताचा तिरंगा (Tiranga) पोस्ट केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. जॉन सीना याने तिरंगा का पोस्ट केला? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी यावर चांद्रयान-3 चा तर्क लावला आहे. चांद्रयानासाठी चक्क जॉन सीना प्रार्थना करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, याचं कारण वेगळं असल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई लेजेंड खेळाडू जॉन सीना पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या सुपरटार स्पेक्टॅकल इव्हेंटमध्ये (Supertar Spectacle) सहभागी होणार आहे. तब्बल 16 वेळा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन असणाऱ्या जॉन सीनाचा भारतातील हा पहिलाच सामना असेल. गेल्या काही महिन्यांपासून जॉन सीना दिसेनासा झाला होता. जॉन सीना 1 सप्टेंबर रोजी होणार्या स्मॅकडाउनच्या (SmackDown) एपिसोडमधून टीव्हीवर पुनरागमन करणार असल्याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. जॉन सीना याने भारतीयांविषयी अनेक प्रेम देखील दाखवून दिलंय.
Cannot wait to reunite with the @WWE family live on #Smackdown! Especially excited to meet the #WWE Universe in India and wrestle for the FIRST TIME EVER in !
The time is NOW…. C U all VERY soon!!! @WWE @WWEIndia https://t.co/ZtvpIBlgAm— John Cena (@JohnCena) August 21, 2023
दरम्यान, मी डब्ल्यूडब्ल्यूई फॅमिलीला स्मॅकडाउनद्वारे लाईव्ह भेटण्याची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. विशेषत: भारतात डब्ल्यूडब्ल्यूई युनिव्हर्सला भेट देण्यासाठी आणि पहिल्यांदाच भारतात कुस्ती खेळण्यासाठी उत्सुक आहे. आपली वेळ आली आहे, लवकरच भेटू, असं ट्विट जॉन सीना याने केलं होतं. त्यानंतर आता लवकर भारत दौऱ्यावर येत आहे.