close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एसबीआयच्या या अकाऊंटमध्ये तुम्हाला मिळणार अधिक व्याज

जर तुम्हाला तुमच्या फिक्स डिपॉझिटवर कमी व्याज मिळतेय तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेत खाते खोलू शकता. 

Updated: May 25, 2018, 01:24 PM IST
एसबीआयच्या या अकाऊंटमध्ये तुम्हाला मिळणार अधिक व्याज

मुंबई : जर तुम्हाला तुमच्या फिक्स डिपॉझिटवर कमी व्याज मिळतेय तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेत खाते खोलू शकता. एसबीआयचा असा दावा आहे की त्यांच्या सेव्हिंग प्लस अकाऊंटमध्ये तुम्हाला इतर अकाऊंटच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. एसबीआयच्या सेव्हिंग प्लस अकाऊंटमध्ये १००० रुपयांहून अधिक असलेली रक्कम आपोआप फिक्स डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर होते. यासाठी ही रक्कम एक हजार रुपयांच्या मल्टिपलमध्ये असली पाहिजे.

मल्टी ऑप्शन डिपॉझिटशी लिंक होते खाते

एसबीआयच्या सेव्हिंग प्लस अकाऊंटमध्ये तुमचे सेव्हिंग अकाऊंट मल्टी ऑप्शन डिपॉझिट अकाऊंटशी लिंक केले जाते. यात मिनिमम बॅलन्सपेक्षा जास्त असलेली रक्कम १००० रुपयांच्या मल्टिपलमध्ये एक ते पाच वर्षांच्या टर्म डिपॉझिट/फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली जाते. सोप्या भाषेत याला तुम्ही स्वीप इन फॅसिलिटी वा फ्लेक्स फिक्स डिपॉझिट म्हणू शकतो.

एसबीआयच्या सेव्हिंग प्लस अकाऊंटप्रमाणेच एचडीएफसी बँकेतही स्वीप इन फिक्स डिपॉझिट आणि आयसीआयसीआय बँकेत फ्लेक्सी डिपॉझिट अकाऊंट आहे. या खात्यांना बँकेनुसार वेगवेगळी नावे देण्यात आलीत. यात मिनिमम बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम असल्यास ही रक्कम आपोआप फिक्स डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर होते. 

एसबीआयचे फिक्स डिपॉझिट रेट

७ दिवस ते ४५ दिवसांपर्यंत - ५.७५ टक्के
४६ ते १७९ दिवसांपर्यंत - ६.२५ टक्के
१८० ते २१० दिवसांपर्यंत - ६.३५ टक्के
२११ ते एक वर्षापर्यंत - ६.३५ टक्के
एक वर्ष ते दोन वर्षांहून कमी - ६.४० टक्के
दोन वर्षाहून अधिक ते तीन वर्षांपेक्षा कमी - ६.६ टक्के
तीन वर्षे ते पाच वर्षांपर्यंत - ६.७ टक्के
पाच वर्षे ते १० वर्षापर्यंत - ६.७५ टक्के