Zee Media ची दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी मोठी भेट! 4 नवीन डिजिटल चॅनेल लॉन्च, चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी केलं अभिनंदन

Zee Media : 'झी मीडिया'ने दक्षिण भारतीय 4 भाषांमध्ये नवीन डिजिटल न्यूज चॅनल लॉन्च केले आहे. यामध्ये कन्नड भाषेत 'झी कन्नड न्यूज', तामिळ भाषेत 'झी तामिळ न्यूज', तेलगू भाषेत 'झी तेलगू न्यूज' आणि मल्याळम भाषेत 'झी मल्याळम न्यूज' सामिल आहेत.

Updated: Jan 25, 2022, 11:12 AM IST
Zee Media ची दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी मोठी भेट! 4 नवीन डिजिटल चॅनेल लॉन्च, चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी केलं अभिनंदन title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे मीडिया नेटवर्कपैकी एक असलेल्या 'झी मीडिया'ने आपला विस्तार केला आहे. 'झी मीडिया'ने दक्षिण भारतीय 4 भाषांमध्ये नवीन डिजिटल न्यूज चॅनल लॉन्च केले आहे. यामध्ये कन्नड भाषेत 'झी कन्नड न्यूज', तामिळ भाषेत 'झी तामिळ न्यूज', तेलगू भाषेत 'झी तेलगू न्यूज' आणि मल्याळम भाषेत 'झी मल्याळम न्यूज' सामिल आहेत. झी मीडियाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते डिजिटल न्यूज चॅनेलचे लॉन्चिंग झाले.

आजपासून प्रसारण सुरू
'झी मीडिया'ने प्रथमच डिजिटल टीव्ही चॅनेल लॉन्च केले असून या चॅनेल्सचे प्रसारण 25 जानेवारी म्हणजेच आजपासून सुरू झाले आहे. 'झी तेलगू न्यूज'चे हैदराबाद येथून लॉन्चिंग झाले. तसेच कन्नड प्रेक्षकांसाठी बंगळुरूमधून 'झी कन्नड न्यूज' लॉन्च झाले.

लाईव्ह टीव्ही फॉरमॅटमध्ये झाले डिजिटल चॅनेल लॉन्च
दक्षिण भारतीय राज्यांमधील तामिळ ही एक प्रमुख भाषा आहे. तेथे 'झी मीडिया' आधिपासूनच लोकप्रिय आहे. तामिळ प्रेक्षकांसाठी 'झी तामिळ न्यूज' लॉन्च झाले आहे. तसेच मल्याळम भाषिक प्रेक्षकांसाठी 'झी मल्याळम न्यूज' हे डिजिटल चॅनेल देखील लॉन्च करण्यात आले आहे. हे चॅनेल लाईव्ह फॉरमॅटमध्ये तसेच युट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत.

दक्षिण भारतातील घराघरात पोहचण्याचा उद्देश
'झी मीडिया' प्रत्येक दक्षिण भारतीय राज्यांमध्ये प्रत्येक घराघरात पोहचावा हे डिजिटल चॅनेल्स लॉंचिंगचे उद्देश आहे. देश आणि जगभरातील प्रेक्षकांना 'झी मीडिया'शी जोडण्याचा हा उद्देश आहे. डिजिटल चॅनेल असल्याने कंटेंटचा विस्तार आणि विविधता खूप जास्त असेल. दक्षिण भारतीय प्रेक्षक बातम्यांसाठी डिजिटल माध्यमांचा खूप वापर करतात. त्यामुळे 'झी मीडिया'ला प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांमध्ये क्रमांक 1 ची पसंती बनायचे आहे.

'झी मीडिया'चे नेटवर्क
26 वर्षापासून 'झी मीडिया' न्यूज व्यवसायात आहे. 'झी मीडिया'चे 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये 14 न्यूज चॅनेल आहेत. मीडियाचे 220 दशलक्ष प्रेक्षक आहेत. यासोबतच डिजिटल स्पेसमद्ये मीडियाचे 362 दशलक्ष प्रेक्षक आहेत. 'झी मीडिया' संपूर्ण भारतातील न्यूज ब्यूरो आणि कॉरस्पॉन्डंटसह सर्वात तेजीने वाढणारे नेटवर्क आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म ग्रोथ इंजिन आहे. जे या चॅनेल्सला पुढे घेऊन जाणार आहे. डिजिटल न्यूज स्पेसमध्ये नियोजन यशस्वी करण्यासाठी कंपनी आशावादी आहे.