Zomato IPO Listing | झोमॅटोच्या स्टॉकची बाजारात दमदार एन्ट्री; लिस्ट होताच शेअरमध्ये तेजी

फुड डिलिवरी कंपनी झोमॅटोची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली आहे. झोमॅटोचा शेअर BSE मध्ये 115 रुपयांवर लिस्ट झाला आहे

Updated: Jul 23, 2021, 12:03 PM IST
Zomato IPO Listing | झोमॅटोच्या स्टॉकची बाजारात दमदार एन्ट्री; लिस्ट होताच शेअरमध्ये तेजी title=

मुंबई : फुड डिलिवरी कंपनी झोमॅटोची शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री झाली आहे. झोमॅटोचा शेअर BSE मध्ये 115 रुपयांवर लिस्ट झाला आहे. कंपनीच्या आयपीओ(IPO)ची लिस्टींग प्राइस बँड 76 रुपये होती. कंपनी आता शेअर 52 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला आहे. आपीओची साईज 9375 कोटी रुपये होती. 

लिस्टिंगनंतर शेअरमध्ये वाढ
लिस्टिंगनंतर झोमॅटोच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. 115 रुपयांवर लिस्ट झालेला शेअर दुपारी 12 वाजेपर्यंत 124 रुपयांवर ट्रेड करीत होता. या शेअरने आतापर्यंत 129 रुपयांचा हाय बनवला आहे. कंपनीचा युनिक बिझिनेस मॉडेलचे बाजाराने स्वागत केले आहे. गुंतवणूकदारांनीही या आयपीओला पसंती दिली होती.

झोमॅटोच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये चांगली क्रेझ पाहायला मिळाली होती. हा आयपीओ 38 टक्के जास्त सब्सस्काईब झाला. आयपीओत 75 टक्के भागिदारी संस्थात्मक गुंतवणूकदारांची होती. तर 15 टक्के भागिदारी गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांची होती.  तसेच 10 टक्के भागिदारी रिटेल गुंतवणूकदारांसाठी होती. तसेच 65 लाख शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी आरक्षित होते.