रत्नागिरीत २ दिवसांत तब्बल २१ रुग्ण वाढले

 दोन दिवसात तब्बल २१ कोरोना रूग्ण आढळून आले 

Updated: May 11, 2020, 01:21 PM IST
रत्नागिरीत २ दिवसांत तब्बल २१ रुग्ण वाढले  title=

रत्नागिरी : रत्नागिरीत आता कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. मागच्या आठ दिवसात ३६ तर दोन दिवसात तब्बल २१ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, हे सारे मुंबई रिटर्न आहेत. सध्या या साऱ्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरेना रूग्णांची वाढती संख्या जिल्हावासियांकरता चिंतेचा विषय ठरत आहे. 

मुंबई, पुणे येथून देखील चाकरमानी येत असून त्यांच्याबाबत वैद्यकीय सेवा पुरवण्याइतपत आपण सक्षम आहोत का? प्रशासनाची देखील तयारी आहे का? असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४२ झाला असून नव्यानं सापडलेल्या रूग्णांची संख्या ही ३६ आहे. ५ रूग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी परतले असून २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातला आकडाही वाढला 

राज्यात कालच्या एका दिवसात कोरोनाचे १,२७८ रुग्ण वाढले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २२,१७१ एवढी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचा : लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत अडकलेल्यांसाठी दिलासादायक बातमी

महाराष्ट्रात काल कोरोनाचे ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरी होणाऱ्यांची संख्या ४,१९९ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाने सर्वाधिक कहर केला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या १३,७३९ एवढी आहे, तर ५०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.