35 lakh Weddings In 23 Days: दिवाळीनंतर म्हणजेच तुळशीचं लग्न लागल्यानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होणार आहे. सणासुदीच्या कालावधीबरोबरच लग्न सोहळ्यांसंदर्भातील खरेदीचा जोर पुढील काही महिन्यांमध्ये वाढणार असल्याने व्यापाऱ्यांनीही यासाठी विशेष तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर लगेच सुरु होत असलेल्या लग्नाच्या सीझननिमित्त मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. यावर्षी 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच देव उठान एकादशीपासून लग्न सोहळ्यांचा सिझन सुरु होत आहे. हा सिझन 15 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
एका अंदाजानुसार या कालावधीमध्ये देशभरात एकूण 35 लाख लग्नं पार पडणार आहेत. या लग्नांसाठी वेगवगेळ्या सेवा पुरवणाऱ्या उद्योगांची रेलचेल असणार आहे. लग्न सोहळ्यांच्या या सिझनमध्ये जवळपास 4.25 लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कन्फ्रेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी 'कॅट'मधील संशोधन विभाग म्हणजेच कॅट रिसर्च अॅण्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीच्या हवाल्याने एक अहवाल जारी केला आहे. देशातील 20 मुख्य शहरांमधील व्यापारी आणि लग्नासंदर्भातील सेवा पुरवणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं. केवळ दिल्लीमध्ये या सिझनदरम्यान तब्बल 3.5 लाख लग्न होणार आहे. दिल्लीमध्येच या 23 दिवसाच्या कालावधीत जवळपास 1 लाख कोटींची उलाढाल होणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 लाख लग्न होणार आहे. यावेळेस एकूण खर्च 3.75 लाख कोटी इतका झालेला.
कॅटच्या अध्यात्मिक तसेच वैदिक ज्ञान समितीचे अध्यक्ष वैदिक विद्वान आचार्य दुर्गेश तारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षत्रांच्या गणनेप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त 23,24,27,28,29 तारखेला आहेत. तर डिसेंबर महिन्यात 3,4,7,8,9 तारखेला तसेच 15 तारखेला लग्नाचा मुहूर्त असून हे दिवस लग्नांसाठी शुभ आहेत. यानंतर थेट जानेवारी महिन्यात शुभ दिवस असतील.
भरतिया आणि खंडेलवाल यांनी लग्नाच्या या सीझनमध्ये जवळपास 6 लाख अशी लग्न आहेत ज्यामध्ये प्रत्येक लग्नात किमान 3 लाख रुपये खर्च केले जातील. जवळपास 10 लाख लग्न अशी असतील ज्यात 6 लाखांहून अधिक लग्न होती. 12 लाख लग्नांमध्ये 10 लाख रुपये खर्च केले जातील. तर 25 लाख रुपये प्रत्येक लग्नासाठी खर्च केले जातील असे 6 लाख लग्न सोहळे असतील. 50 हजार लग्न अशी आहेत ज्यामध्ये 50 लाख रुपये खर्च होतील. 50 हजार लग्न सोहळ्यांमध्ये 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एकूण या लग्न सोहळ्यांमध्ये 4.25 लाख रुपये खर्च होतील. या सिझननंतर जानेवारीपासून ते जुलैपर्यंत लग्नांचा सिझन असेल असं सांगण्यात आलं आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.