कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...

Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Dec 28, 2024, 06:22 PM IST
कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर... title=

Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेदात आपल्या आरोग्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आलंय. आयुर्वेदानुसार औषधं जेवढं कडू तेवढंच ते गुणकारी मानलं जातं. कोरोना महासंकटानंतर लोकांचा कल आहे घरगुती आणि आयुर्वेदिक औषधांकडे वळला आहे. नैसर्गिक घरगुती उपाय हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. निसर्गात असे अनेक वनस्पती आहे, जे आरोग्यासाठी वरदान ठरतात. त्यातील एक आहे कडुलिंबाची पानं. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर कडुलिंबाचा पानं खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबाची पानं कडू असली तरी ती अनेक रोगावर फायदेशीर मानली गेली आहे. 

शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर असल्याच तज्ज्ञ सांगतात. कडुलिंबात अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत मिळते. त्याचप्रमाणे रक्तशुद्धीकरणास, सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील ही पानं खूप उपयुक्त आहेत. कडुलिंबाची पानं कर्करोग होण्याचा धोका कमी करते, असं तज्ज्ञ सांगतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचे सेवन केलं जातं. दातांच्या, हिरड्यांच्या मजबुतीसाठी हा पाला उपयुक्त मानला गेलाय. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी अॅसिड असते. जे केसांच्या मजबुतीसाठी आणि वाढीसाठी मदतगार आहे. यात अँटीऑक्सिडंट असून रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी मदत मिळते. पाल्याचा रस केसांचा वाढीसाठी लावला जातो. 

 

हेसुद्धा वाचा - अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल

 

त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्त्चचादेखील तेज वाढतो. मुरूम, सुरकुत्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत मिळते. तज्ज्ञ सांगतात, खास करुन रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पानाचा सेवन केल्यास, आतड्यांसाठी ते जास्त फायदेशीर मानले गेलेय. 

रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्या एक वाईट लक्षण असून ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पानाचा रस गुणकारी मानला जातो. या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत मिळते. पोट फुगणे थांबते.

हळद आणि पाला एकत्र खाल्यास द्विगुणीत फायदे मिळतात. पाल्याची पेस्ट करुन, पाण्यात उकळवून, त्याचा रस काढून, पाने भाजून, अशाप्रकारे त्याच सेवन करावं. मात्र कडुलिंबाची ताजी पाने रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर मानली गेलीय. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)