अंबानी कुंटुबातील आताच्या पिढीतील हे शेवटचं लग्न. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा थाटच निराळा होता. या लग्नाला कोण उपस्थित नव्हतं, असं विचारणं चुकीचं ठरणार नाही. अगदी बॉलिवूड ते टॉलिवूडपर्यंतचे सगळे सेलिब्रिटी, राजकारणी पण ते फक्त महाराष्ट्र, भारतातील नाही तर अगदी अमेरिकेतीलही, जगातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी बहुतांश सगळीच मंडळी उपस्थित होती. पण या सगळ्या चर्चा रंगली ती आपल्या सदाबहार आणि मनमोहक अशा रेखा आणि ऐश्वर्या या दोघींच्या मिठीची.
ऐश्वर्या राय बच्चन अनंत अंबानी यांच्या लग्नाला मुलगी आराध्यासोबत दिसली. यावेळी ऐश्वर्या बच्चन कुटुंबियांसोबत दिसली नाही. ऐश्वर्याचा यावेळी स्टनिंग लूक पाहायला मिळाला. लाल रंगाच्या सुंदर अनारकलीमध्ये ऐश्वर्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. मनीष मल्होत्राचं कलेक्शन असलेल्या या लाल रंगाच्या अनारकलीने सगळ्यांची मन जिंकली.
ऍशच्या अनारकली सेटचे डिटेलिंग अतिशय सुंदर होते. रेशमाच्या पोशाखावर चांदीच्या जरीच्या माध्यमातून स्ट्राइप्स आणि कैरींप्रमाणे डिझाइन बनवल्या जात होत्या. त्यात गोल्डन जरदोजी आणि गोटा वर्क जोडले होते, जे कपड्यांचे सौंदर्य आणखी वाढवत होते.
वयाच्या 69 मध्ये रेखाचं जे सौंदर्य आहे ते दिवसेंदिवस खुलत आहे. लग्नात रेखा गोल्डन कलरची साडी परिधान करून पोहोचली होती. रेखाने मारून रंगाची फुल स्लीव्ह ब्लाउज असलेली गोल्डन साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी धाग्याने सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती.
रेखाने कपाळावर टिका, गळ्यात मोठा हार आणि हातात भरपूर बांगड्या घातल्या होत्या. तर हातात पिवळ्या रंगाची पोटली होती.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात रेखा आणि ऐश्वर्या एकमेकांच्या समोर आल्या. तेव्हा रेखा आणि ऐश्वर्या यांनी एकमेकांना मिठी मारली. या दोघींमधील नातं किती घट्ट आहे, हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं. या दोघींमधील हे क्षण चर्चेचा विषय ठेवला.
अंबानी यांच्या या शाही सोहळ्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. या शाही लग्नाला बच्चन कुटुंबिय एकत्र आले. यामध्ये बिग बी, जया बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन नंदा, निखिल नंदा, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांचा सहभाग होता. तर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन मात्र दोघी वेगळ्या आल्या. यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काही ठिक नसल्याचं सांगण्यात येत आहे.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.