कोणत्याही काळात ट्रेंडमध्ये अव्वल राहतील मुला-मुलींची 'ही' नावे

Baby Names And Unique : जाणून घ्या अशा मुला-मुलीच्या नावांबद्दल जे कधीही म्हातारे होत नाहीत आणि नेहमी ट्रेंडमध्ये राहतात. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 17, 2024, 12:20 PM IST
कोणत्याही काळात ट्रेंडमध्ये अव्वल राहतील मुला-मुलींची 'ही' नावे title=

प्रत्येक पालकाला आपल्या मुलासाठी सर्वात सुंदर नाव निवडायचे असते. कालांतराने मुलांच्या नावांबाबत लोकांच्या आवडीनिवडीही बदलत राहतात. कधी आधुनिक नावांना प्राधान्य दिले जाते, तर कधी पारंपारिक नावे ट्रेंडमध्ये असतात. काही मुलांची नावे आहेत जी नेहमीच ट्रेंडमध्ये असतात.

येथे आम्ही तुम्हाला मुलांची अशी काही नावे सांगत आहोत जी कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाहीत. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी आणि मुलीसाठी अशी नावे देखील निवडू शकता जी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. अशा मुलांची कोणती नावे आहेत जी कधीही जुनी होणार नाहीत आणि कायमच ट्रेंडमध्ये राहतील.

'अ' अक्षरावरुन मुला मुलींची नावे 

तुम्ही तुमच्या मुलासाठी आदित्य, अभिषेक आणि अर्जुन यांची नावे पाहू शकता. आदित्य नावाचा अर्थ सूर्य. अभिषेक नावाचा अर्थ मूर्तीला दूध किंवा पाणी अर्पण करणे असा आहे. अर्जुन हे संस्कृत नाव असून या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा असा होतो.

मुलांचे नाव आणि अर्थ

तुम्ही तुमच्या बाळाचे नाव 'चिन्मय' ठेवू शकता. चिन्मय नावाचा अर्थ आनंदी. याशिवाय 'देव' आणि 'गौतम' अशी नावे आहेत ज्यांचा अर्थ अंधार दूर करणारा आहे. 'देव' हा शब्द देवाला संबोधण्यासाठी वापरला जातो. तुम्ही तुमच्या बाळासाठी या तीनपैकी कोणतेही एक नाव निवडू शकता.

ट्रेंडी नाव 

'जय' हे नाव तुमच्या बाळासाठी देखील खूप चांगले होईल. 'जय' नावाचा अर्थ विजेता. 'कार्तिक' नावाचा अर्थ धन्य आहे. याशिवाय मुलांसाठी 'कृष्ण' नाव देखील आहे आणि या नावाचा अर्थ गडद रंगाचा आहे. तिन्ही नावे अतिशय सुंदर आहेत.

युनिक नावे 

तुम्ही 'न' ने सुरू होणारी नावे शोधत असाल तर तुम्ही "नितीन' नावाचा विचार करू शकता. 'नितीन' नावाचा अर्थ नवीन. याशिवाय 'रोहन' आणि 'रोहित' ही नावे आहेत. 'रोहन' हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे आणि त्याचा अर्थ चढता आहे. याशिवाय 'रोहित' म्हणजे लाल रंग.

मुलींची युनिक नावे

'दिक्षा' हे नाव मुलींसाठी खूप लोकप्रिय आहे. या नावाचा अर्थ 'भेट' किंवा देणगी आहे. याशिवाय 'देविका' नाव देखील आहे ज्याचा अर्थ देवी आहे. 'दिया' आणि 'गौरी' ही नावेही आहेत. 'दिया' म्हणजे प्रकाश आणि 'गौरी' हे देवी पार्वतीचे नाव आहे. मुलींसाठी पहिले नाव 'अदिती' आहे ज्याचा अर्थ स्वतंत्र आणि अमर्यादित आहे. यानंतर 'अमृता' हे नाव देखील आहे ज्याचा अर्थ अमर आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव आराधना ठेवू शकता. या नावाचा अर्थ 'प्रार्थना' किंवा 'उपासना' आहे. 'अवंतिका' या नावाचा अर्थ राणी असा होतो.