हेल्थ इश्यू आणि होणाऱ्या पत्नीची साथ... राधिकाबद्दल स्पष्टच बोलले अनंत अंबानी

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जोरदार सगळीकडे चर्चा सुरु आहे. यामध्ये अनंत अंबानी पहिल्यांदाच भावी पत्नी राधिका मर्चंटबद्दल अतिशय मोकळेपणाने बोलताना दिसले. एकमेकांची साथ किती महत्त्वाची असते? हे या नात्यावरुन उघड होतंय? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 29, 2024, 11:48 AM IST
हेल्थ इश्यू आणि होणाऱ्या पत्नीची साथ... राधिकाबद्दल स्पष्टच बोलले अनंत अंबानी  title=

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड लग्नाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. 1 मार्च ते 3 मार्च या दिवसांत शाही विवाह सोहळ्याचे प्री वेडिंग फंक्शन गुजरात जामनगर येथे होणार आहेत. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा साधेपणा दिसून येत आहे. 

या दरम्यान अनंत अंबानी यांनी भावी पत्नी राधिका मर्चंटबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जोडीदारा निवडीबाबत पहिला विचार ते राधिकासोबतचं लग्न या सगळ्या भावना अनंत अंबानी यांनी व्यक्त केल्या आहेत. राधिकाने अनंत अंबानी यांना त्याच्या आजारपणात दिलेली साथ ही मोलाची ठरते. या दोघांनी लग्नाअगोदर आपल्या वागणुकीतून रिलेशनशिपच्या खास टिप्स शेअर केल्या आहेत. 

राधिका माझ्या स्वप्नांची राणी 

अनंत अंबानी सांगतात की, राधिका माझ्या जीवनात आल्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. ती माझी स्वप्नातील राणी आहे. लहानपणी मला वाटायचं की, मी कधीच लग्न करणार नाही कारण मी नेहमी प्राण्यांसोबतच वेळ घालवायचो. त्यांचा पालन-पोषण करण्याचा माझा विचार होता. एवढंच नव्हे तर लहानपणापासूनच मला अनेक शारीरिक व्याधिंना सामोरे जावे लागत होते. 

नीता अंबानी यांच्याकडून आजारपणावर भाष्य

नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत अनंत अंबानीला अस्थमाचा त्रास होत असल्याचं सांगितलं. यामुळे वजन कमी करण्यामध्ये अनंतला त्रास होत असल्याचंही सांगितलं. अनंत अंबानी यांची वेटलॉस आणि हेल्थ प्रवास खूप खडतर असल्याचंही सांगितलं होतं. मात्र कुटुंबाचा सपोर्टमुळे तो आजवर या सगळ्यावर मात करु शकल्याचं नीता अंबानी म्हणाल्या. 

हेल्थ इश्यूमध्ये राधिकाची साथ महत्त्वाची 

अंनत अंबानी यांनी आपल्या हेल्थ इश्यूमध्ये राधिकाचा साथ महत्त्वाची असल्याचं मोकळेपणाने सांगितलं आहे. या प्रवासात राधिकाने खूप सपोर्ट केल्याचं ते सांगतात. आजारापणातील वेगवेगळ्या समस्यांना मी सामोरे गेल्याचं अनंत अंबानी सांगतात. या कठिण समयी राधिका एखाद्या खंबीर आधारासारखी माझ्यासोबत असल्याचं अनंत सांगता. या दोघांनीही फार कमी वयात एकमेकांना दिलेली साथ मोलाची ठरत नाही. नातं घट्ट करण्यासाठी हा स्वभाव खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, हे यामधून लक्षात येतं. 

नातं घट्ट टिकून राहण्यासाठी काय करावं?

  • एकमेकांना खडतर काळात भक्कम साथ द्यावी 
  • जसे आहेत तसे एकमेकांना स्वीकारा 
  • लोकं काय म्हणतात, यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे सर्वात महत्त्वाचं?
  • पालकांकडून, मोठ्यांकडून अनेक गोष्टी शिकाव्यात
  • प्रेम, आदर, कृतज्ञता, सन्मान सगळ्याच गोष्टी मोकळेपणाने बोला