सेलिब्रिटींसारखा लूक हवाय? नाईट पार्टीसाठी 'या' रंगांचे कपडे वेअर करा

आजकाल लेट नाईट पार्टीचा ट्रेंड जास्त आहे. मोठ मोठ्या सेलिब्रिटींपासून ते तुमच्या आमच्या सारखे सगळेच पार्टी म्हटलं की ती रात्रीची अरेंज केली जाते. अशा वेळी कोणत्या रंगाचा ड्रेस निवडावा हे कळत नाही. 

Updated: May 24, 2024, 02:10 PM IST
सेलिब्रिटींसारखा लूक हवाय? नाईट पार्टीसाठी 'या' रंगांचे कपडे वेअर करा  title=

खास पार्टीला जाण्यासाठी सगळ्याच महिला कपडे आणि मेकअपवर खूप मेहनत घेतात. जसं नाईट पार्टीचा ट्रेंड आहे त्याप्रमाणे पार्टीतले फोटो सोशलमीडियावर पोस्ट करणं हा ट्रेंड देखील आता तितकाच महत्त्वाचा होत आहे. आपल्या वॉर्डड्रॉपमध्ये खूप कपडे असतात पण पार्टीला जाताना नेमकं कोणत्या रंगांचे कपडे वेअर करावेत यायाबत महिलांमध्ये खूप प्रश्न पडलेले असतात. म्हणूनच आम्ही तुम्हला सांगणार आहोत की लेट नाईट पार्टीला जाताना तुम्ही काय वेअर करू शकता ?

आकर्षित करणारा काळा रंग 


नाईट पार्टीला खास करून काळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य जास्त दिलं जातं. काळा रंग हा वॉर्म कलर म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही बॅचलर पार्टी, ऑफिसची सक्सेस पार्टी किंवा मग तुमच्या मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असाल तर तुम्ही काळ्या रंगाचा वनपिस वेअर करू शकता. फॅशन एक्स्पर्ट असं म्हणतात की, काळा रंग वेअर केल्याने तुम्हाला हॉट आणि ग्लॉसी लूक येतो. तुमची त्वचा उजळ असो किंवा तुम्ही सावळ्या रंगांचे जरी असलात तरी तुमच्या स्किनटोनला काळ्या रंगाचे कपडे  सूट करतात. लाईट पिंक शेड आणि हलकासा मेकअप हा तुमच्या काळ्या रंगाच्या वनपिसवर खुलून दिसतो.

पांढरा किंवा सिल्व्हर रंगाचा ड्रेस


बहुतेक सेलिब्रिटी हे नाईट पार्टीला पूर्ण पांढरा किंवा बोल्ड सिल्व्हर रंगांचा ड्रेस वेअर करतात. पांढरा आणि सिल्व्हर या दोन्ही रंगांमुळे तुम्ही कॉन्फिडेनंट दिसता. मेकअप आणि त्यावर डार्क पिंक शेड किंवा न्यूड कलरच्या लिपस्टिकने तुमचा लूक सुंदर दिसतो.

लाल रंग


कान्स फेस्टिवलवरमध्ये जगातले टॉपच्या सेलिब्रिटिंचे रेड कार्पेटवरचे मनमोहन फोटोशूट पाहून आपल्याला ही असा लूक करावा असं प्रत्येकाला वाटतं. म्हणूनच  तुम्ही नाईट पार्टीसाठी लाल रंगांचा गाऊन वेअर करू शकता. डार्क मेकअप आणि हॉट रेड लिपस्टिक हा लूक तुम्ही पार्टीसाठी करू शकता.

गोल्डन रंगांचा ड्रेस


गोल्डन रंगाचा ड्रेस तुम्हाला खूपच आकर्षक बनवतो.  बॅचलर पार्टीसाठी या रंगांचा शॉर्ट वनपिस तुम्ही वेअर करू शकता. जर तुम्ही  वॉर्म अंडरटोनमध्ये येत असाल तर पार्टी लूकसाठी गोल्डन शॉर्ट वनपीस हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.त्यामुळे तुम्हाला जर  पार्टीसाठीसाठी जाताना कोणत्या रंगाचा ड्रेस वेअर करावा हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही या  रंगांचे पर्याय निवडू शकता. या रंगांच्या ड्रेसमुळे तुम्हाला सेलिब्रिटींसारखा हॉट अँड ग्लॉसी लूक करता येऊ शकतो.