Chanakya Niti Advice For Husband: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्य चाणक्य नितीत अनेक मार्ग सांगितले आहे. चाणक्य नितीत राजनीती, कूटनीती आणि अर्थनीतीचे ज्ञान सविस्तर दिले आहे. त्याचबरोबर आयुष्य अधिक सोप व सुखी ठेवण्यासाठीही काही मंत्र देण्यात आले आहेत. त्यांनी काही असे मार्ग सांगितले आहेत जे आजच्या आधुनिक युगातही चपखलपणे बसतात. इतकंच नव्हे तर वर्तमानातही युवावर्ग त्यांच्या नितीचा पालन करत यश मिळवत आहेत.
आचार्य चाणक्य यांनी संसार सुरळीत चालवण्यासाठीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. वैवाहिक आयुष्य सुरळीत हवे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टींचे पालन कराच. चाणक्य यांच्यानुसार, काही गोष्टी तुमच्या पत्नीसोबत कधीच शेअर करु नयेत. तुमच्या पत्नीपासून या गोष्टी नेहमीच लपवून ठेवा, जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ते.
चाणक्य निती यांच्या मते, एका पतीने त्याच्या पत्नीला त्याच्या उत्पन्नाबद्दल कधीच सगळं काही सांगू नये. तसं पाहायला गेलं तर पत्नी काटकसर करुन घर चालवण्यात माहि र असतात. मात्र, तर पतीचा पगार जास्त असेल तर स्वतःवर खर्च करण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळं खर्चात अधिक वाढ होते. अशावेळी जेव्हा गरज पडते तेव्हा पैशांची कमतरता भासते.
चाणक्य निती म्हणते की, पतीने पत्नीला कधीच त्याची कमकुवत बाजू नेहमी लपवून ठेवली पाहिजे. कधीच भावनेच्या भरात तुमच्या कमकुवत बाजुचा उल्लेख करु नका. कारण पत्नी तुमच्याच याच असहायतेचा फायदा घेऊन तुमच्याकडून काम करुन घेईल. ज्यामुळं घरात व समाजात तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो.
असं म्हणतात की गुप्तदान हे श्रेष्ठदान आहे. डाव्या हाताने केलेले दान उजव्या हाताला पण कळू शकणार नाही अशारितीने दान करावे. हे एक पुण्याचे काम असते. आचार्य चाणक्य म्हणतात की, तुम्ही केलेले दान तुमच्या पत्नीलाही सांगू नका. त्यामुळंही त्याचे महत्त्व उरत नाही.
चाणक्य निती यांच्या मते, पतिला त्याच्या अपमानाबद्दल कधीच पत्नीला सांगू नये. कारण कधीच कोणती पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करु शकणार नाही. मग अशावेळी तिला बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसवणार नाही आणि मग वाद आणखी वाढू शकतो. त्यामुळं लक्षात ठेवा की अपमान व भांडणांबद्दल कधीच पत्नीला सांगू नये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)