प्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?

Periods After Delivery: प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

Updated: Sep 26, 2024, 02:12 PM IST
प्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?  title=

1st Periods After Delivery: आईच्या गर्भात नऊ महिने बाळ वाढत असते. पण या काळात बाळाचा विकास होत असताना, आईच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे बदल फक्त बाह्यच नव्हे तर आंतरिकही असतात. त्यामुळे प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी येताना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  

काही महिलांना आपल्या प्रसूतीनंतर 40 दिवसांनी मासिक पाळी येते, तर काहींना त्यासाठी एक वर्षही लागू शकते. याशिवाय, प्रसूतीनंतर एकदा मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली, तर पुढील महिन्यातही मासिक पाळी नियमितपणे येणे महत्त्वाचे आहे. जर तुमची मासिक पाळी चुकली तर पुन्हा गर्भधारणेची शक्यता वाढते.

पहिली पाळी येणे स्तनपानावर अवलंबून असते

प्रसूतीनंतर पाळी येणे हे अनेक घटकांवर अवलंबून असते. बाळ जर आईचे दूध पित असेल, तर पहिली मासिक पाळी येण्यास 8 आठवडे किंवा त्याहून अधिक काळही लागू शकतो. पण आई बाळाला पूर्ण स्तनपान करत नसेल, कमी करत असेल किंवा बाळ बाटलीने दूध पित असेल तर मासिक पाळी 6-8 आठवड्यांतही येऊ शकते. पण जर तुम्ही फक्त स्तनपान करत असाल, तर तुम्ही स्तनपान कमी करणे सुरू करेपर्यंत तुमची पाळी परत येणार नाही. जो काळ काही महिने किंवा वर्षांनंतरचाही असू शकते.

 

हेही वाचा: तुम्हीही ब्रेडसोबत चीज स्लाईस खाता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक

 

प्रसूतीनंतरची पहिली पाळी 

प्रत्येक महिलेचा प्रसूतीनंतरची पहिली पाळी येण्याचा अनुभव वेगळा असू शकतो. पण सामान्यतः पोटाभोवती तीव्र वेदना, जास्त रक्त प्रवाह, मासिक पाळीच्या रक्तामध्ये गाठी जाणवणे आणि मासिक पाळी अनियमित होणे अशा समस्या जाणवतात.

सी-सेक्शन नंतरची पहिली पाळी

सिझेरियन प्रसूती झालेल्या महिलांचा अनुभव सामान्य प्रसूती झालेल्या महिलांपेक्षा वेगळा असू शकतो. सामान्य प्रसूती झाल्यास 6-8 आठवड्यांत मासिक पाळी येते. पण सी-सेक्शननंतर मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव आणि वेदना होऊ शकतात. कारण सिझेरियनच्या ऑपरेशन दरम्यान आत आराम देणारे सर्व एंडोमेट्रियल टिश्यू काढून टाकले जातात. त्यांमुळे सी-सेक्शन झालेल्या महिलांना सुरूवातीला जास्त त्रास होऊ शकतो. 

जास्त रक्तस्त्राव, तीव्र वेदना किंवा सतत रक्तस्त्राव होणे यांसारख्या त्रास होऊ शकतो याची माहिती तुम्हाला असायला हवी. पण यापेक्षा काही वेगळे लक्षणे असल्यास, जास्त त्रास झाल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण नेहमी येणाऱ्या पाळीपेक्षा प्रसूतीनंतरच्या पहिल्या पाळीचा अनुभव वेगळा असू शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)