तुम्हीही ब्रेडसोबत चीज स्लाईस खाता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक

Cheese Slice Side Effects: तुम्हाला ब्रेड आणि चीज स्लाईस खायला आवडत असेल, पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. चला जाणून घेऊया चीज खाल्याने आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो. 

Updated: Sep 26, 2024, 12:32 PM IST
तुम्हीही ब्रेडसोबत चीज स्लाईस खाता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक title=

Harmful Effect of Eating Cheese Slice Daily: चीज हे एक लोकप्रिय डेअरी पदार्थ आहे. ज्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. त्याची चव आणि क्रीमी टेक्चर सगळ्यांनाच आवडते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चीज आकर्षित करते. आजकाल चीजचा स्लाईसचा ट्रेंड खूप वाढला आहे. वेगवेगळ्या पदार्थांसोबत चीज स्लाईस खाल्ली जाते. अनेक लोक सकाळी नाश्त्याला ब्रेड सँडविचमध्ये चीज घालून खातात. पण यावर झालेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे की, चीज आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. चला जाणून घेऊया चीज खाल्याने आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो. 

वजन कमी करण्यासाठी चीज स्लाईसचा वापर अयोग्य?

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक आपल्या आहारात चीजचा समावेश करतात. कधीकधी आहारतज्ञही प्रोटीनचा सोर्स म्हणून योग्य प्रमाणात चीजचे सेवन करायला सांगतात. पण साध्या चीज ऐवजी डाएटमध्ये चीड स्लाईसचा वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याने वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून कोणतेही डाएट फॉलो करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या. 

 

हेही वाचा: ब्रेड आणायला गेली अन् फेमस झाली, 5 वर्षांची मुलगी बनली एका बड्या कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बॅसडर

 

चीज स्लाईसमध्ये असलेले घातक घटक

1. हाय सोडियम फूड

चीज स्लाइसमध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते आणि ते आपल्या शरीरासाठी सर्वात घातक आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि हाय कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होतो. फक्त एका चीज स्लाइसमध्ये 200 मिलीग्राम सोडियम असू शकते.

2. कृत्रिम घटक

चीज स्लाइस साध्या आणि गुळगुळीत बनावटीसाठी ओळखली जाते. पण असे आकर्षक दिसण्यासाठी त्यात इमल्सीफायर्स, स्टॅबिलायझर्स आणि कृत्रिम रंग टाकलेला असतो. हे सगळे पदार्थ आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. ज्यामुळे काही व्यक्तींना पचना संबंधीत समस्या आणि ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.

3. प्रोसेस्ड फॅटस् 

चीज स्लाइसमध्ये सहसा प्रोसेस्ड फॅटस् (प्रक्रिया केलेले चरबी) असते. जे चीजमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या फॅटच्या तुलनेत फारसे आरोग्यदायी मानले जात नाही. यामुळे तुमचे वजन वाढून टाइप 2 मधुमेहासारख्या रोगांचा धोका संभवू शकतो.

4. पोषकतत्वांचा अभाव

नैसर्गिक चीजच्या तुलनेत चीज स्लाइसमध्ये अनेक पोषकतत्वांची कमतरता असते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोबायोटिक्स सारखे महत्त्वाचे घटक कमी असतात. 

5. पर्यावरणाची हानी

चीज स्लाइस प्लास्टिकमध्ये पॅक केल्या जातात. यामुळे रोजच्या प्लॅस्टिक कचऱ्यात वाढ होऊन मातीचे प्रदूषण होते. त्या पॅकेजिंगमध्ये असलेली रसायने चीजमध्येही जाऊ शकतात आणि या सगळ्यामुळे आपल्या शरीराचेही नुकसान होते. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)