Holi2024: होळीमध्ये वापरले जाणारे केमिकल रंग देतात अनेक आजारांना आमंत्रण,वाचा सविस्तर

 लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला रंगपंचमी खेळण्याची उत्सुकता असते. असं असलं तरी बाजारात मिळणाऱ्या बनावट रंगांमुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळतं. रासायिक आणि केमिकल मिश्रित रंगांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.   

Updated: Mar 19, 2024, 05:07 PM IST
Holi2024: होळीमध्ये वापरले जाणारे केमिकल रंग देतात अनेक आजारांना आमंत्रण,वाचा सविस्तर  title=
रंगपंचमी खेळण्यासाठी वापरण्यात येणारे रंग हे केमिकल विरहित असणं महत्त्वाच आहे. बाजारातून आणण्यात आलेल्या रंगांमध्ये ऑक्साइड, क्रोमियम आयोडाइड, कॉपर सल्फेट, मरकरी सल्फाइट आणि अ‍ॅल्युमीनियम ब्रोमाइड यासारखे केमिकल घटक शरीराला हानीकारक आहेत. 
 
बनावट रंग बाजारात सहज उपलब्ध असतात. होळी यायला आता फक्त आठवडा उरला आहे. रंग खेळताना नैसर्गिक रंग वारण्याला प्राधान्य  द्यावं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांची त्वचा ही अतंत्य संवेदनशील असते. त्वचेच्या आरोग्याव्यतिरिक्त या रंगांमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. केमिकल मिश्रित रंगांमध्ये रसायन, पारा, सिलिका आणि शिसांचं प्रमाण असल्याने याचा वाईट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत असतो.   
 
 
त्नचेची संबंधित आजार 
 
त्नचेची संबंधित आजार 
रासायनिक प्रक्रिया केलेल्या रंगांमुळे त्वचा कोरडी पडते. त्याचबरोबर ज्यांची त्वचा अतिसंवेदशील असते त्यांनी रंग खेळताना विशेष खबरदारी घ्यावी. केमिकलचा थेट संबंध आल्यानंतर त्वचा चिडते. त्यामुळे लाल चट्टे, पुरळ येणं, त्वचेला खाज सुटणं यासारख्या त्वचेच्या विकारांना आमंत्रण मिळतं. 
 
 
डोळ्यांचे आजार 
डोळ्यांची बाब अतिशय नाजूक असते. केमिकलचा गंभीर परिणाम हा डोळ्यांवर लगेच होतो. रासायनिक रंगांमुळे डोळ्यांची जळजळ होणं, सतत डोळ्यातून पाणी येणं या समस्या होत असतात. त्याशिवाय अति केमिकलमुळे कायमचे अंधत्व येण्याची शक्यता जास्त असते. 
 
कर्करोगाची शक्यता 
केमिकल मिश्रित रंगांमध्ये शिसं आणि क्रोमियम सारखे घटक असतात. या घटकांमुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. या केमिकल घटकांचे गंभीर परिणाम शरीरावर बराच काळ दिसून येतात. 
 
श्वसनाचे आजार 
होळीच्या दिवशी रंग उडवले जातात. त्यामुळे याचे कण हवेत मिसळून जातात. या केमिकलच्या तीव्र प्रभावामुळे खोकला आणि अस्थमा यासारखे श्वसनाचे गंभीर आजार होतात. त्याशिवाय गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ती यांची रोगप्रतिकारक शक्ती ही सर्वसाधारण व्यक्तींच्या तुलनेत फार नाजूक असते. त्यामुळे महिलांनी अशा रंगांपासून लांब रहावं. 
 
पर्यावरण प्रदूषण  
रासायनिक रंगांचा परिणाम फक्त  मानवी जीवनावरच नाही तर पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होत असतो. हे रंग मातीत आणि पाण्याच मिसळले जातात याचा परिणाम हा जैवविविधतेवरही होतो. मातीत केमिकल मिसळ्याने वनस्पती आणि झांडांची वाढ खुंटते. झाडं जळून जातात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.