वयाच्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला; असा होता 'बालशिवाजी' ते 'छत्रपती'पर्यंतचा प्रवास

Chhatrapati Shivaji Jayanti: जेव्हा जेव्हा भारतीय इतिहासाची चर्चा होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. वीर योद्धा, कुशल शासक, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रवास पाहणार आहोत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 26, 2024, 05:13 PM IST
वयाच्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला; असा होता 'बालशिवाजी' ते 'छत्रपती'पर्यंतचा प्रवास title=

Shivaji Birth, Life, Wife, Children, Battles All in Marathi:  शिवाजी कोण होते? शिवाजी महाराजांचे कार्य? आपण त्यांची आठवण का ठेवतो? आपण सर्वांनी लहानपणी शिवाजी महाराजांबद्दल वाचले असेल. ते महाराष्ट्राचे प्रमुख राजकारणी, साम्राज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते. तरुण वयातच आव्हानांना तोंड देत त्यांनी अनेक युद्धे लढली आणि आपले संपूर्ण आयुष्य धर्मरक्षणासाठी समर्पित केले. 28 मार्च 2024 रोजी छत्रपती शिवरायांची तिथीनुसार जयंती आहे. या निमित्ताने जाणून घ्या त्या शूर व्यक्तीबद्दल ज्याचे नाव इतिहासाच्या सुवर्ण पानात नोंदवले गेले आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला, पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी राजे भोसले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई होते. आपल्या आईच्या धार्मिक गुणांचा शिवाजी महाराजांवर खूप प्रभाव होता.

महाराजांचे शिक्षण

शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. त्यांना धार्मिक, राजकीय आणि युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई आणि कोंडदेव यांनी त्यांना महाभारत, रामायण आणि इतर प्राचीन भारतीय ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान दिले. राजकारण आणि युद्धनीती त्यांनी बालपणीच आत्मसात केली. त्यांचे बालपण राजा राम, गोपाळ, संत आणि रामायण, महाभारतातील कथा आणि सत्संगात गेले. ते सर्व कलांमध्ये पारंगत होते.

महाराजांच्या पत्नी आणि मुले 

शिवाजी महाराजांचा पहिला विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. तेव्हा शिवाजी 10 वर्षांचे होते. त्यांच्यापासून शिवाजी महाराजांना 4 मुले झाली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, थोरला मुलगा संभाजी हा गादीवर आला.

महाराजांनी छत्रपती ही उपाधी कशी मिळाली?

शिवाजी महाराजांना अनेक पदव्या मिळाल्या होत्या. 6 जून 1674 रोजी रायगड येथे मराठ्यांचा राज्याभिषेक झाला. 
याशिवाय छत्रपती, क्षत्रियकुलवंत, हिंदवा धर्मधारक अशा पदव्या त्यांच्या शौर्यामुळे देण्यात आल्या.
आदिलशहाचा कट : विजापूरचा अधिपती आदिलशहाने महाराजांना अटक करण्याचा कट रचला. यात महाराज वाचले, पण त्यांचे वडील शहाजी भोसले यांना आदिलशहाने कैद केले. शिवाजी महाराजांनी हल्ला करून प्रथम वडिलांची सुटका केली. नंतर पुरंदर, जावेली हे किल्लेही ताब्यात घेतले.
त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाया केल्या आणि जिंकल्या.
त्यांच्या गनिमी युद्ध कौशल्याचा शत्रूंवर मोठा प्रभाव पडला.
त्यांची धोरणे, लष्करी योजना आणि युद्धकौशल्य यामुळे सर्वांनी त्यांचा आदर केला.
त्यांच्या बलाढ्य सैन्यामुळे ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते बनले.
औरंगजेबाचा विश्वासघात : औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कपटाने कैद केले होते. पण त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि हुशारीमुळे ते कैदेतून सुटला आणि नंतर औरंगजेबाच्या सैन्याशी लढले. पुरंदर तहात दिलेले 24 किल्ले परत जिंकले.
3 एप्रिल 1680 रोजी थोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले.