एकवेळ तुम्ही बाहेर जाताना मेकअप न करता फक्त लिपस्टीक लावली तरी तुमचा लुक चांगला दिसतो. तुमचा लुक चांगला दिसण्यासाठी परफेक्ट शेडची लिपस्टीक निवडणं गरजेचं आहे.त्यासाठी तुम्हाला तुमचा अंडरटोन माहित असणं गरजेचं आहे.
अंडरटोन ओळखायचा कसा ?
अंडरटोनचे तीन प्रकार असतात. कोल्ड अंडरटोन,वॉर्म अंडरटोन आणि न्युट्रल अंडरटोन, या तीन अंडरटोनवरून मेकअप कसा करावा हे समजतं. सकाळच्या कोवळ्या ऊन्हात तुमच्या मनगटाच्या शीरा या जर निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील तर तुमचा कोल्ड किंवा कूल अंडरटोन आहे. जर तुमच्या मनगटावरच्या शीरा हिरवट दिसत असतील तर तुमची त्वचा वॉर्म अंडरटोनमध्ये येते.जर तुमच्या मनगटावरील शीरा या मोरपीशी रंगाच्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा न्युट्रल समजला जातो.
लिपस्टीकची शेड कशी निवडावी ?
कोल्ड अंडरटोन
तुमच्या त्वचेचा रंग हा प्रदुषणामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे काळवंडला जातो, मात्र अंडरटोन म्हणजेच त्वचेच्या आतील रंगाचा थर हा कधीही बदलत नाही. त्यामुळे लिपस्टीकची शेड निवडताना अंडरटोन हा फार महत्त्त्वाचा ठरतो. कुल अंडरटोनच्या व्यक्तींची त्नचा साधारण गुलाबी रंगाची असते. त्यामुळे कुल अंडरटोनच्या स्त्रियांनी लाल, पीच कलर किंवा फिकट गुलाबी रंगाची शेड शोभून दिसते. कुल अंडरटोनच्या स्त्रियांना न्यूड पिंक लिपस्टीकचा शेड शोभून दिसतो. अनुष्का शर्मा हीचा कोल्ड अंडरटोन असल्याने तिच्यावर न्यूड पिंक लिपस्टीकचा शेड सुंदर दिसतो.
वॉर्म अंडरटोन
वॉर्म अंडरटोनच्या स्त्रियांना हलक्याश्या ब्राउन रंगाची लिपस्टीक सूट करते. तुमच्या स्कीन टोनला मॅच होणारी लिपस्टीक तुमच्या मेकअपला अजूनज सुंदर बनवते. बोल्ड नारंगी, ब्रीक रेड कलर किंवा डार्क पिंक शेड ओठांवर छान दिसतो. जर तुमची त्वचा गोरी असेल तर लाईट न्यूड कलर आणि जर तुमची सावळी त्वचा असेल डार्क न्यूड कलर तुमच्या ओठांवर छान दिसतो. दीपिका पादुकोन ही वॉर्म अंडरटोनमध्ये येते.
न्युट्रल अंडरटोन
न्युट्रल अंडरटोन असणाऱ्या स्त्रियांना सहसा कोणत्याही रंगाची शेड छान दिसते. त्यांचा अंडरटोन हा वॉर्म आणि कोल्ड या दोन्हींच मिश्रण असल्याने यांना हॉट किंवा न्यूड पिंक शेड तसंच पिच आणि बेबी पिंक कलर किंवा हॉट रेड देखील उठून दिसते.